
जेव्हा महाराष्ट्राच्या CM ना जॅकी म्हणतो,'क्या भिडू...'; वाचा मजेदार किस्सा
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात(Maharashtra Politics) जी उलथापालथ झालेली पहायला मिळत होती ती अखेर एकनाथ शिंदे(Eknath Shinde) मुख्यमंत्री(Chief Minister) झाल्यावर क्षमली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ३० जून,२०२२ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली,तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. याच दरम्यान आता सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सुनिल शेट्टी(Suniel Shetty) यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला गेला आहे. या व्हिडीओत सुनील शेट्टी,महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आणि जॅकी श्रॉफ(Jackie Shroff) यांचा एक किस्सा सांगताना दिसत आहे.(Jackie Shroff asked, 'kya bhidu...' to Maharashtra CM- Suniel Shetty revealed)
हेही वाचा: तब्बल 22 विनोदी कलाकार एकाच सिनेमात, 'झोलझाल' ठरणार हास्याचा बूस्टर डोस
हा व्हिडीओ म्हणजे रितेश देशमुख आणि साजिद खान यांचा टॉक शो 'यारों की बारात' मधील एक क्लीप आहे. या क्लिप मध्ये सुनिल शेट्टी,जॅकी श्रॉफ आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या दरम्यान घडलेला एक किस्सा आहे. सुनिल शेट्टी अॅक्टिंग करीत सांगताना दिसत आहे की,''महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उभे होते आणि मी त्यांच्यासमोर उभा होतो''. सुनील पुढे अभिनय करतच म्हणताना दिसतोय,''जॅकी दादा आले मागून आणि थेट बोलले,क्या भीडू!,चांगलं करताय काम तुम्ही...महाराष्ट्राची प्रगती होणार...गूड गूड'',सुनिल पुढे म्हणतो की, ''ते मुख्यमंत्री होते,ते देखील हैराण होऊन जॅकी दादाकडे पहायला लागले''.
हेही वाचा: नुपूर शर्मांना सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर अग्निहोत्रींचे tweet Viral
अभिनय करतानाच सुनिलने हे देखील दाखवलं की कसं मागून येऊन जॅकी श्रॉफनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर हात मारला होता. मुख्यमंत्र्यांशी बोलताना देखील जॅकी श्रॉफ त्यांच्या नेहमीच्या अंदाजातच कसे बोलले हे सुनिलनं अभिनय करुन सांगितलं. यानंतर रितेशने जॅकी श्रॉफला हे खरं आहे का? असं विचारलं. पण यावर जॅकी श्रॉफनी आपल्याला आठवत नाही याविषयी असं सांगून बोलणं टाळलं. त्या माजी मुख्यमंत्र्यांचे नाव देखील सांगायला जॅकी श्रॉफ तयार होईना.
हेही वाचा: 'नजर' लागू नये म्हणून प्रियंका चोप्रा करते 'ही' गोष्ट, स्वतः केला खुलासा
महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ३० जून,२०२२ रोजी सायंकाळी आश्चर्यकारक रित्या घोषणा करत शिवसेनेविरोधात बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं. केंद्राच्या आदेशावर हा निर्णय त्यांनी घेतला आणि उपमुख्यमंत्री पद स्वतःकडे घेतलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संध्याकाळी साडे सात वाजता राजभवनात एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविथी करुन घेतला. शपथ घेताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Web Title: Jackie Shroff Asked Kya Bhidu To Maharashtra Cm Suniel Shetty Revealed The
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..