Ashok Chavan Friendship : अशोक चव्हाणांचा कॉलेजमध्ये राडा झाला अन् भांडण मिटवायला पोहचले महेश मांजरेकर

आज माजी मुख्यमंत्री अन् कॉंग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
ashok chavan friendship with mahesh manjrekar since college fight with students marathi news
ashok chavan friendship with mahesh manjrekar since college fight with students marathi news sakal

Ashok Chavan Friendship With Mahesh Manjrekar : आज माजी मुख्यमंत्री अन् कॉंग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. २०२२ साली एकनाथ शिंदे २०२३ साली अजित पवार आणि २०२४ च्या सुरवातीला अशोक चव्हाण, गेली तीन वर्षे महाराष्ट्र तीन मोठ्या राजकीय भूकंपाने हादरला आहे.

अशोक चव्हाण म्हणजे नांदेड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ. त्यांचे वडील म्हणजेच शंकरराव चव्हाण हे देखील मुख्यमंत्री होते. मराठवाड्याच्या दुष्काळी भागात जलक्रांतीचे प्रयोग करणाऱ्या शंकरराव चव्हाणांना आधुनिक भागीरथ म्हणून ओळखले जायचे. संपूर्ण राज्याच्या राजकारणाला शिस्त लावण्याचा हेडमास्तरी प्रयत्न त्यांनी केला. त्यांची मुले देखील सर्वसामान्य मुलांप्रमाणे वाढली.

ashok chavan friendship with mahesh manjrekar since college fight with students marathi news
Ashok Chavan यांचा Congress ला रामराम, BJP प्रवेश निश्चित? महत्वाचं पत्र आलं समोर

अशोक चव्हाण दहावीपर्यंत स्कूल बसने शाळेला जायचे. त्यांच कॉलेज सुरू झाले तेव्हा तर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री बनले होते तरीही अशोक चव्हाण यांना सोडायला सरकारी कार वगैरे सुविधा मिळाल्या नाहीत त्यांना सिटीबसनेच कॉलेजला जावे लागे.

अशोक चव्हाण आपल्या आठवणी मध्ये सांगतात की शंकरराव चव्हाण हे माझे वडील आहेत, हे मी बराच काळ कॉलेजमध्ये माहिती होऊ दिले नव्हते. कारण मी त्यांचा मुलगा आहे, हे कळाले तर मित्र आणि शिक्षकांच्या वागणुकीत कदाचित कृत्रीमपणा वाढेल, असे मला वाटायचे.

या काळात अशोक चव्हाण यांची भेट झालेल्या एका मित्राशी त्यांची दोस्ती आजही कायम आहे. तो मित्र म्हणजे हिंदी सिनेमा सृष्टी गाजवणारे अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर.

सत्तरच्या दशकात एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये हे दोघे एकत्र होते. महेश मांजरेकर यांना देखील अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत हे ठाऊक नव्हतं. दोघांची घट्ट मैत्री झाली अन् पुढे एकदा वर्तमानपत्रात फोटो आल्यानंतर त्यांना अशोक चव्हाणांच सिक्रेट कळालं.

ashok chavan friendship with mahesh manjrekar since college fight with students marathi news
Ashok Chavan Resignation : "अचानक असं काय घडलं? मला वाटतं की...", अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर ठाकरे स्पष्टच बोलले

कॉलेज मध्ये त्यांचा एक ग्रुप बनला होता. अनेकदा ते सर्व मित्र सिनेमा पाहायला जायचे. अशोक चव्हाण यांना राजेश खन्ना खूप आवडायचा. ते नेहमी आराधना या सिनेमातील मेरे सपनो कि राणी हे गाणे गुणगुणत असायचे.

महेश मांजरेकर आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगतात की एका अशोक चव्हाण यांचे कॉलेजमध्ये एका मुलाशी वाद झाले होते. त्या मुलाने त्यांना खूप त्रास दिला. अशोक चव्हाण चिडून मांजरेकरांकडे आले अन् म्हणाले की काही तरी कर.

मांजरेकर म्हणतात की मी काही मित्रांना घेऊन गेलो आणि त्या मुलाला डोस दिला अन् ते प्रकरण मिटवलं.

खरं तर अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र होते. त्यांनी सांगितलं असतं तर मुंबईतला कोणताही पोलीस ऑफिसर आला असता आणि त्यामुलाला झोडत घेऊन गेला असता पण त्याने तसं नाही केलं. हेडमास्तर म्हणवल्या जाणाऱ्या शंकरराव चव्हाणांचे संस्कार तो कधीच विसरला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com