अशोक सराफांना खटकतेय मराठी सिनेसृष्टी; म्हणाले,'गेली कित्येक वर्ष मी...'

अशोक सराफ यांनी गेली ५० हून अधिक वर्ष शेकडो सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारुन चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.
Ashok Saraf Speaks About Marathi FIlm Industry
Ashok Saraf Speaks About Marathi FIlm IndustryInstagram

अशोक सराफ(Ashok Saraf) म्हणजे अभिनयातला 'कोहिनूर हिरा' असं म्हटलं तर कुठे वावगं ठरू नये. मराठीच नाही तर हिंदीतही अशोक सराफ यांनी आपलं अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. गेली ५० हून अधिक वर्ष हा अवलिया चाहत्यांना आपल्या अभिनयातून कधी हसवताना दिसला,तर कधी रडवताना तर कधी खलनायकी भूमिका साकारुन चाहत्यांचा रागही ओढवून घेताना दिसला. सिनेमात विनोदाचा अचूक टायमिंग साधत लोकांना खळखळवून हसवणारे अशोक सराफ प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूप गंभीर आहेत बरं का. नेमकं बोलतात,नेमकं हसतात असं जर मी म्हटलं तर तुम्हाला खरं नाही वाटणार. पण एकदा का कुणाशी त्यांचे सूर जुळले मग मात्र गप्पांचा फड मस्त रंगतो. मी एक पत्रकार म्हणून जितक्यांदा त्यांना भेटलेय त्यातून प्रत्येक वेळेला ते अनुभवलंय. त्यांच्याशी गप्पा मारताना अख्ख सिनेविश्व नजरेसमोर उभं करायचे ते. (Ashok Saraf Speaks About Marathi FIlm Industry)

Ashok Saraf Speaks About Marathi FIlm Industry
Jawan Teaser Out: जखमी शाहरुख,चेहऱ्यावर पट्ट्या; खतरनाक आहे 'जवान'चा टीझर

मराठीत नाटक,सिनेमा-मालिका विश्वात गेली अनेक वर्ष काम करुन अजरामर भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफांचा आज ७५ वा वाढदिवस. यानिमित्तानं सकाळ डिजिटलला दिलेल्या विशेष मुलाखतीत अशोक सराफांनी आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यावर, सिने-कारकिर्दीवर संवाद साधता साधता एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. अशोक सराफ म्हणाले की,''गेली काही वर्ष त्यांनी मराठी सिनेमा(Marathi Movie) पाहिलेलाच नाही. मराठी सिनेमा ज्या कथानकासाठी प्रसिद्ध असायचा तो कथेचा सूरच कुठेतरी हरवला आहे. आज माझ्या घराच्या एका कपाटात शेकडोंनी स्क्रिप्टसचा गठ्ठा पडलेला आहे. ज्यांच्याकडे मी पाहिलं देखील नाही. कारण जेव्हा येणाऱ्या स्क्रिप्टविषयी मला तोंडी सांगितलं जातं तिथेच माझा मूड जातो,कथेत दम नाही हे जाणवतं आणि मग माझ्या त्या कपाटात आणखी एक स्क्रिप्ट जाऊन पडते. मी मात्र तिकडे दुर्लक्षच करतो''.

Ashok Saraf Speaks About Marathi FIlm Industry
Ashok Saraf Birthday: रितेश देशमुखचं 'ते' स्वप्न अशोक सराफांनी केलं पूर्ण

आज हौसे-नवसे-गवसे अशा कथाकारांचा-दिग्दर्शकांचा देखील भरणा खूप झालाय. अर्थात यात सगळेच तसे आहेत असं म्हणता येणार नाही. पण जास्तीत जास्त तसेच निघतात ज्यांना केवळ अनुदानासाठी मराठी सिनेमा करायचाय, एखादा सिनेमा नावावर जमा करुन दिग्दर्शकाचा टिंबा मिरवायचाय म्हणून सिनेमा करायचा आहे अन् त्यात मग थुकरट कथेवर सिनेमा करायला घेऊन कथानकाच्या दर्जासाठी प्रसिद्ध असेलल्या मराठी सिनेसृष्टीचा दर्जा घसरवायचा. असं हे सगळं सुरु असल्यानं मी गेली अनेक वर्ष अशा दिग्दर्शकांना उभंच करत नाही. मला ज्या कथा आवडतात,पटतात त्यात मी काम करतो. आज मराठी सिनेमांना खरंतर गरज आहे चांगल्या लेखकांची,उत्तम कथाकारांची,जे उत्तम कथा सांगून लोकांचं निखळ मनोरंजन करतील. आज मराठी इंडस्ट्रीत ते सगळं मागे पडत चाललंय पण वेळीच जाग आली तर उशीरही झालेला नाही''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com