Ashvini Bhave Birthday: अमेरिकेत दिवसभर काय करतात अश्विनी भावे? असा आहे दिनक्रम..

अभिनेत्री अश्विनी भावे यांचा आज वाढदिवस.. त्यानिमित्ताने जाणून घेऊया ही खास बात..
Ashvini Bhave Birthday special news her america routine work house garden career lifestyle
Ashvini Bhave Birthday special news her america routine work house garden career lifestyle sakal

Ashwini Bhave birthday news: मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. अनेक चित्रपट, नाटक या मधून त्यांनी मराठी रसिकांचे रंजन केले. अत्यंत कमी वयात मनोरंजन क्षेत्रात आलेल्या या अभिनेत्रीने मराठी प्रेक्षकांना तर भुरळ घातलीच शिवाय बॉलीवुडही गाजवले.

'बनवा बनवी', 'वजीर', 'ध्यानीमनी' सए कितीतरी चित्रपट त्यांनी केले. 'बनवाबनवी' मधील त्यांची लिंबू कलरची साडी प्रेक्षक अजूनही विसरलेले नाहीत. पण यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे पती सोबत अमेरिकेत जाऊन स्थाइक होण्याचा.

त्यामुळे चाळीत वाढलेल्या अश्विनीने करियरच्या एका विशिष्ट टप्प्यावर अमेरिका गाठली. सध्या त्या अमेरिकेतच असतात आणि वर्षातून एकवेळ भारतात येऊन सर्वांच्या भेटीगाठी घेतात. काही महत्वाची कामं असतील तर ती मार्गी लावतात. ही भारतात वाढलेली ही अभिनेत्री अमेरिकेत काय करत असेल बरं असा प्रश्न सर्वानाच पडतो. तर आज त्यांच्या वाढदिवासानिमित्त जाणून घेऊया.. त्या अमेरिकेत नेमकं काय करतात..

(Ashvini Bhave Birthday special news her america routine work house garden career lifestyle )

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, 'भारतातून अमेरिकेत जाणं हे आव्हानात्मक होतंच. मी १५ वर्षांची असताना पहिलं नाटक केलं. त्यामुळे माझं लग्नापर्यंतचं करिअरही यशस्वी झालं होतं. मला संसार करायचा आहे हे माझं स्वप्न होतं. संसाराच्या आघाडीवरही मी यशस्वी आहे.'

'पण तिथे गेल्यावर सांस्कृतिकदृष्ट्या वेगळा अनुभव मिळाला. मी चाळीत जन्माला आले. नवीन फ्रॉक आणला तरी मी सगळ्या घरांमध्ये जाऊन पाया पडून यायचे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये शेजारपाजारातील अलिप्तपणा तेव्हा जाणवला. मात्र हा त्या संस्कृतीचा भाग आहे हे मी मान्य केलं. तो एक तडजोडीचा काळ होता.'

'तिथे गेल्यावर मी अनेक गोष्टी शिकले. फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला. नवीन काहीतरी शिका, त्यातून नवीन दिशा मिळेल हे अमेरिकी धोरण मी स्वीकारलं. त्यामुळे मला जे आवडतं त्यात मी काही नवीन शिकू शकले. विद्यार्थ्यांकडून मला नव्या गोष्टी कळल्या. तिथल्या रितीभाती कळायला लोकांमध्ये मिसळायला लागतं.'

'त्यामुळे भारतात आले की काम करते आणि अमेरिकेत असते तेव्हा संसार करते, असं माझं ठरलं आहे. इथे अमेरिकेत मला माझ्यासाठी वेळ देता येतो.'


हेही वाचा : Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पुढे अश्विनी भावे म्हणाल्या, ''अमेरिकेत मी खरोखरच एकटी असते. पण म्हणूनच मी अनेक मार्ग शोधले. मी स्वयंपाकघरात पूर्वी फार काही केलेलं नव्हतं. मग मी तिथे वळले. मी त्यात प्रयोग करायला लागले. मला लहान गोष्टींतून आनंद मिळतो. आनंद मिळायला केवळ एखादा चित्रपट यशस्वी व्हायला हवा असं नाही. आपण लोकप्रियतेचं अवडंबर माजवतो आणि वाहवत जाऊ शकतो. त्यालाही महत्त्व आहे. माझ्या हृदयातील एक कोपरा त्यासाठी आहे. पण केवळ ते असणं म्हणजे अश्विनी असणं असं नाही. त्यापलीकडेही मी आहे.'

'माझं माझ्या बागेवर प्रचंड प्रेम आहे. माझ्या मुलांनी शाळेत असताना झाडांसंदर्भात काही प्रयोग केले होते ती झाडं आमच्या अंगणात आहेत. माझ्या बागेत पहिल्यांदा फरसबीची शेंग आली त्याचा मला खूप आनंद झाला. मी बागकामाचे व्हिडीओज आता पोस्ट करत असले तरी मी हे सगळं खूप आधीपासून करतेय. मला त्यातून मिळालेला आनंद मला लोकांशी शेअर करावासा वाटतो म्हणून मी व्हिडीओ पोस्ट करते.' असा अमेरिकेतील दिनक्रम त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com