Ashvini Mahangade: 'राणूअक्का' नंतर अश्विनी महांगडे साकारणार अहिल्याबाई होळकर! पोस्ट शेयर करत म्हणाली..

अभिनेत्री अश्विनी महांगडेची मोठी घोषणा..
Ashvini Mahangade announce her movie punyashlok ahilyabai holkar she play lead role as ahilyabai
Ashvini Mahangade announce her movie punyashlok ahilyabai holkar she play lead role as ahilyabaisakal
Updated on

Ashvini Mahangade: मालिकांमधील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. या आधी आपण अश्विनीला एका ऐतिहासिक भूमिकेत पाहिलेच आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत तिने संभाजी महाराजांच्या बहिणीची म्हणजे राणूअक्का यांची भूमिका साकारली होती.

आता पुन्हा एकदा अश्विनी ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. अश्विनीने आज याबाबत घोषणा केली. अश्विनी तिच्या आगामी चित्रपटात अहिल्या बाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे. 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' असे या चित्रपटाचे नाव आहे.

(Ashvini Mahangade announce her movie punyashlok ahilyabai holkar she play lead role as ahilyabai)

Ashvini Mahangade announce her movie punyashlok ahilyabai holkar she play lead role as ahilyabai
Salman Khan : सलमान खान बांधणार 19 मजली हॉटेल! काय काय असेल यात? वाचा एका क्लिकवर..

याबाबत अश्विनीने एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये चित्रपटाचे पोस्टर असून अहिल्याबाई होळकर यांच्या रूपात अश्विनी महांगडे दिसते आहे. सोबतच अश्विनीने एक खास कॅप्शनही दिले आहे.

अश्विनी म्हणते, ''इंदूर संस्थानचे संस्थापक, वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करते. आज अतिशय आनंदाची बातमी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. खुप मोठी जबाबदारी, मनावर दडपण आणि तितकाच आनंद होत आहे.''


''माझी प्रमुख भुमिका असलेला "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर" या चित्रपटाची आज घोषणा झाली. रसिक मायबाप प्रेक्षकहो याही चित्रपटावर आपण प्रेम करावे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. '' अशा शब्दात अश्विनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी मनोरंजन विश्वात अशा मोजक्या अभिनेत्री आहेत ज्या कलाक्षेत्रात सक्रिय आहेतच शिवाय त्या सामाजिक भान सुद्धा जपत असतात. त्यापैकीच एक म्हणजे अश्विनी महांगडे. ती स्वतः 'रायतेचे स्वराज्य' या तिच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात सक्रिय असते.

सध्या ती 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) युय मालिकेत 'अनघा' ही भूमिका साकारत आहे. अश्विनी सोशल मीडियावर देखील लोकप्रिय असून, तिच्या कामाचे अनेक चाहते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahilyabai Holkar Karjmukti Yojana 2026 beneficiary list released for 3266 farmers in Junnar
mahesh tilekar on ashwini bhave
Forgotten Scottish Tribute to Ahilyabai Holkar Revived After 177 Years
Malhar Rao Holkar's Reign Documented
Marathi News Esakal
www.esakal.com