#AskAnupam अनुपम खेर म्हणाले, विचारा प्रश्न! अन् मग काय....

टीम ईसकाळ
Saturday, 17 August 2019

काही वादग्रस्त वक्तव्य असो किंवा अनुपम खेर यांचा एखादा गाजलेला चित्रपट.. पण आज ते एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ट्विटरवर #AskAnupam हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. त्याचे कारण पण काही खास आहे.  

न्यूयॉर्क : नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असणार अभिनेते म्हणजे अनुपम खेर! मग ते काही वादग्रस्त वक्तव्य असो किंवा त्यांचा एखादा गाजलेला चित्रपट.. पण आज ते एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ट्विटरवर #AskAnupam हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. त्याचे कारण पण काही खास आहे.  

सध्या अनुपम न्यूयॉर्कमध्ये एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये असून त्यांना 2 सीन्स शूट करायच्यामध्ये मोकळा वेळ मिळाला. त्यामुळे त्यांनी ट्विटरवर तसे सांगितले व नेटकऱ्यांना #AskAnupam हा हॅशटॅग वापरून प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. सोशल मीडिया अहोरात्र अॅक्टिव्ह असल्यामुळे अनुपम खेर यांच्या ट्विटर अकाऊंटवर प्रश्नांचा पाऊस पडला आणि खेर यांनी सर्व प्रश्नांना उत्तरे दिली.

यापैकी काही प्रश्न मजेशीर आहेत तर काही गंभीर दखल घेण्यासारखे. मुंबई छान आहे की न्यूयॉर्क, तुमच्यासाठी राष्ट्रहित महत्त्वाचे की बॉलीवूड, तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा धडा कोणता, कलम 370 रद्द केल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय, असे अनेक प्रश्न खेर यांना नेटकऱ्यांनी विचारले तर खेर यांनीही याची गंमतीशीर उत्तरे दिली. भारतात रात्र असल्याने व न्यूयॉर्कमध्ये दिवस असल्याने पहाटे पहाटे हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडिंग होता.  

अनुपम खेर यांच्या आत्मचरित्राचे मुखपृष्ठ नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहे. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव 'Lessons Life Taught Me Unknowingly' असे आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ask anupam this hashtag trending on twitter related to Anupam Kher