esakal | रुचा आपटेने 'मुळशी पॅटर्न'मधील अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ
sakal

बोलून बातमी शोधा

Rucha Apte and Kshitij Date

रुचा आपटेने 'मुळशी पॅटर्न'मधील अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'अस्सं माहेर नको गं बाई', 'तुझ्यात जीव रंगला' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री रुचा आपटे नुकतीच लग्नबंधनात अडकली. 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटातील अभिनेता क्षितिज दातेशी रुचाने लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत, कोव्हिडचे सर्व नियम पाळत हा लग्नसोहळा पार पडला. रुचा आणि क्षितिजचं लग्न पुण्यात पार पडलं.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला होता. अनेक महिन्यांनी रुचाने सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो पोस्ट केला होता. आता रुचाच्या मित्रमैत्रिणींनी तिच्या लग्नाचा फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नसोहळ्यात रुचाने हिरवी सहावारी साडी नेसली असून क्षितिजने मरून रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. या दोघांवर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा : 'इतिहासात आपल्या पिढीची नोंद ही..'; निर्बंधांचं पालन न करणाऱ्यांना सुबोधने फटकारलं

रुचा आणि क्षितिजने मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्येही काम केलंय. क्षितिजने 'मुळशी पॅटर्न' या लोकप्रिय चित्रपटात गण्याची भूमिका साकारली होती. प्रवीण तरडे दिग्दर्शित आगामी 'सरसेनापती हंबीरराव' या ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटातही तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. 'बन मस्का' या मालिकेत रुचा आणि क्षितिजने एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. क्षितिज अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही कार्यरत आहे.

loading image