esakal | 'इतिहासात आपल्या पिढीची नोंद ही..'; निर्बंधांचं पालन न करणाऱ्यांना सुबोधने फटकारलं
sakal

बोलून बातमी शोधा

Subodh Bhave

'इतिहासात आपल्या पिढीची नोंद ही..'; निर्बंधांचं पालन न करणाऱ्यांना सुबोधने फटकारलं

sakal_logo
By
स्वाती वेमूल

देशात कोरोना रुग्णसंख्या आणि बळींनी सोमवारी नवा उच्चांक नोंदवला. गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ५२ हजार ९९१ रुग्ण आढळले, तर २ हजार ८९२ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना नागरिकांकडून अजूनही निर्बंधांचं काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. अशा नागरिकांना अभिनेता सुबोध भावेनं फटकारलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत आणि इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित सुबोधने चाहत्यांपर्यंत त्याचा संदेश पोहोचवला आहे.

सुबोध भावेची पोस्ट-

'इतिहासात आपल्या पिढीची नोंद ही बेजबाबदारपणे वागल्याने करोना नावाच्या विषाणूने संपवलेली पिढी अशी न होता, जबाबदारीने एकत्र येऊन त्यावर मात केलेली पिढी अशी होणं आवश्यक असेल तर आपल्याला अधिक शहाणं होण्याची गरज आहे', अशी पोस्ट त्याने लिहिली. याचसोबत त्याने एक व्हिडीओ पोस्ट करत अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडणं टाळा, अशी विनंती चाहत्यांना केली आहे.

हेही वाचा : 'कोरोनाने माझा धडधाकट मित्र खाल्ला'; प्रवीण तरडे भावूक

'पोलीस, डॉक्टर, नर्सेस हे सर्वजण दिवसरात्र अथक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा त्यांना सहकार्य करा. अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडणं टाळा, कामाचं नियोजन करून ते पूर्ण करण्यासाठी आठवड्यातून एकदाच बाहेर पडा. प्रत्येकाचा जीव राष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे', असं तो म्हणाला.

loading image