Chahat Pandey: ना पहिली ना दुसरी....'आप'कडून निवडणूक लढवणाऱ्या टीव्ही अभिनेत्रीचा दारुण पराभव!

टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे निवडणुकीच्या रिंगणात उभी होती
Assembly Election 2023 Politics BJP Actress Chahat Pandey contested Election From AAP and faced defeat
Assembly Election 2023 Politics BJP Actress Chahat Pandey contested Election From AAP and faced defeat SAKAL

Chahat Pandey News: मध्यप्रदेश, राज्यस्थान, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांचे निकाल समोर येत आहेत. मध्यप्रदेशमधून एक महत्वाची बातमी समोर येतेय.

या राज्यात विधानसभेसाठी आप पक्षातर्फे चाहत पांडे ही अभिनेत्री दमोह विधानसभेतुन उभी होती. पण तिला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.

विधानसभेसाठी पहिल्यांदाच चाहत पांडे निवडणुकीत उभी होती. पण तिला सपशेल पराभवाला सामोरं जावं लागलंय.

Assembly Election 2023 Politics BJP Actress Chahat Pandey contested Election From AAP and faced defeat
Vishakha Subhedar: "काही पाखरं भरारी मारायला उडून गेली...", नम्रता - प्रसादने नाटक सोडल्यावर विशाखा सुभेदारची पोस्ट व्हायरल

आम आदमी पार्टीची (आप) उमेदवार चाहत पांडे मध्य प्रदेशातील दमोह विधानसभा मतदारसंघातून निवडणूक हरली आहे. तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. या जागेवरून भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मलाय्या 36 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या नंबरवर काँग्रेसचे अजय कुमार टंडन तर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार प्रताप रोहित अहिरवार यांना तिसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले आहे.

मध्य प्रदेशातील दमोह येथे राहणारी टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे या वर्षी जूनमध्ये आम आदमी पार्टीमध्ये सामील झाली होती.

भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मलाय्या यांच्याविरोधात चाहत यांना दमोहमधून उमेदवारी देण्यात आली. त्याचवेळी काँग्रेसचे विद्यमान आमदार अजय टंडन यांचाही या तिरंगी लढतीत सहभाग आहे. आता निकाल समोर आल्याने चाहत पांडेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागलंय.

Assembly Election 2023 Politics BJP Actress Chahat Pandey contested Election From AAP and faced defeat
'मासोली ठुमकेवाली', शिवाली परबच्या नवीन गाण्याचा धुमाकूळ

चाहत पांडेच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर.. तिने 2016 मध्ये 'पवित्र बंधन' या मालिकेद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. ती 'राधाकृष्ण' मालिकेत राधाच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर तिने2019 मध्ये 'हमरी बहू सिल्क'मध्ये दिसली. त्यानंतर चाहतने 'दुर्गा माता की छाया' आणि 'नथ जेवर या जंजीर' या मालिकांमध्ये काम केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com