...म्हणून प्रियांकाला नेटकऱ्यांनी धरले धारेवर

वृत्तसंस्था
रविवार, 21 जुलै 2019

प्रियांकाचा वाढदिवस खास असावा यात पती निक जोनसनं काहीही कसर सोडली नाही. पण, प्रियांका सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. प्रियांकाचा सिगरेट ओढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सध्या सगळीकडेच ती चर्चेत आली आहे.

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानं नुकताच तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या नंतरचा प्रियांकाचा हा पहिलाच वाढदिवस होता. प्रियांकाचा वाढदिवस खास असावा यात पती निक जोनसनं काहीही कसर सोडली नाही. पण, प्रियांका सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. प्रियांकाचा सिगरेट ओढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सध्या सगळीकडेच ती चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर ट्रोल होणं प्रियांकासाठी नवीन नाही मात्र यावेळी सिगरेट ओढताना हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला टार्गेट केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनस आणि आई मधू चोप्रा यांच्या सोबत एका बोटमध्ये बसली असून यावेळी हे तिघंही सिगरेट ओठताना दिसत आहेत. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
 

मागच्या वर्षी दिवाळीच्या फटाक्यांच्या संदर्भातील तिच्या व्हिडिओची आठवण करुन देत युजर्स आता प्रियांकावर टीका करत आहेत. या व्हिडिओमध्ये प्रियांकानं तिला अस्थमा असल्याचा उल्लेख केला होता त्यामुळे आता सिगरेट ओढल्यावर तुला त्रास होत नाही का असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियांकाला विचारला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asthmatic Priyanka Chopra Enjoys a Smoke With Nick Jonas, Netizens Call Her Hypocrite