
मुंबई : कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. लॉकडाऊनमुळे तर सगळीकडेच टाळेबंदी झाली आहे. कलाक्षेत्र देखील थंडावले आहे. सगळचं बंद असल्याने कलाक्षेत्रातील फोटोग्राफर्सलाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा फोटोग्राफर्सच्या मदतीसाठी प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलं अभिनेत्री अथिया शेट्टी आणि आहान शेट्टी पुढे आले आहेत. अथिया आणि आहानने या फोटोग्राफर्सच्या अकाउंट्समध्ये पैसे ट्रान्स्फर केले आहे. सध्या सगळचं बंद असल्याने कलाकारही घराबाहेर न पडता घरीच राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यामुळे फोटोग्राफर्सचे कामही बंद झाले आहे. या कठीण परिस्थितीत अथिया आणि आहान यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी काही फोटोग्राफर्सना आर्थिक मदत केली आहे.
याशिवाय याआधीही या दोघांनी गरजू फोटोग्राफर्सना अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना त्यासाठी परवानगी मिळाली नाही. त्यामुळे या दोन्ही भावंडांनी थेट फोटोग्राफर्सच्या खात्यात रक्कम जमा केली आहे. त्यांना परवानगी मिळाली की ते अन्नधान्याची मदत ही करणार आहेत. मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानीने त्यांच्या सोशल मीडियावर या दोघांचा फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे.
तसेच अथिया-अहानचे आभार मानत त्याने म्हटले की, 'मी अथिया आणि आहानचे आभार मानतो. त्यांनी या कठीण परिस्थितीत आमच्या फोटोग्राफर्सना मदत केली आहे. त्यांना आमच्या फोटोग्राफर्सना अन्नधान्याची मदत करायची होती. मात्र त्यांना याची परवानगी मिळालेली नाही. म्हणून त्यांनी आमच्या फोटोग्राफर्सच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर केले आहे.' कोरोना विषाणूमुळे कलाक्षेत्रात काम करणाऱ्या विविध कामगारां समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पडद्यामागील कलाकारांमध्ये मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टाईल, स्पॉटबॉय आदींसोबतच मनोरंजन क्षेत्रातील फोटोग्राफर्सचाही समावेश आहे. भारतातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन देखील 17 मे पर्यंत वाढविले आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता या कठीण परिस्थितीशी लढण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून अनेक कलाकार मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. आता अथिया आणि आहान देखील पुढे आल्याने या दोघांचे सध्या सोशल मीडियावर खूप कौतुक केले जात आहे.
athiya shetty ayan shetty send funds to accounts of photographers affected by lockdown
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.