
केएल राहुल सोबत लग्न? अथिया शेट्टीने चुप्पी तोडत दिलं धक्कादायक उत्तर
सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया शेट्टी(Athiya Shetty) सध्या आपल्या लग्नाच्या व्हायरल बातम्यांमुळे भलतीच चर्चेत आहे. नुकतीच बातमी होती की अथिया आणि क्रिकेटर केएल राहुल(KL Rahul) येत्या ३ महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. आता आपल्या या लग्नाच्या बातमीवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया समोर आली आहे.(Athiya Shetty breaks silence on reports of her wedding with boyfriend KL Rahul)
हेही वाचा: अशोकस्तंभ वादात अग्निहोत्रींची उडी, विरोधकांना 'शहरी नक्षलवादी' म्हणत टोकलं
अथिया शेट्टीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करत तिच्या लग्नाविषयी व्हायरल झालेल्या बातम्यात काय खरं-काय खोटं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अथियानं एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे- ''आशा करते की मला या लग्नाचं निमंत्रण असेल,जे ३ महिन्यांमध्ये होणार आहे''. यासोबत तिने स्माइल इमोजी देखील पोस्ट केला आहे.

Athiya Shetty react on her wedding VIral News-post image
अथिया शेट्टी आधी सुनिल शेट्टीने(Suniel Shetty) आपल्या मुलीच्या लग्नांच्या बातम्यावर रिअॅक्शन देताना म्हटलं होतं की अथियाच्या लग्नाचं काहीच प्लॅनिंग नाही आणि ना कोणती तयारी सुरु आहे.
हेही वाचा: Laal Singh Chaddha: पेनकिलर्स खाऊन आमिरनं अख्खा सीक्वेन्स शूट केला,कारण...
पुढील ३ महिन्यात होणाऱ्या लग्नाच्या बातम्यांना अथिया शेट्टी आणि तिचे वडील अभिनेते सुनिल शेट्टी यांनी अफवा म्हटलं आहे. मात्र यामुळे केल राहुल आणि अथियाचे चाहते जे कपलच्या लग्नाचं स्वप्न पाहत होते ते निराश झालेयत. पण आशा सोडली नाही पाहिजे. काय माहित पुढील तीन महिन्यात लग्न होईल देखील.
हेही वाचा: वयाच्या ८० व्या वर्षी अमिताभ बच्चन यांचे गुजराती सिनेमात पदार्पण
केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या नात्याविषयी बोलायचं झालं तर ३ वर्षांहून अधिक काळ ते दोघे एकत्र नात्यात आहेत,पण दोघांनी कधीही या नात्यावर उघडपणे बोलणं टाळलं. मात्र त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्या की त्यांच्यात प्रेम आहे हे लगेच लक्षात येतं. अनेक पब्लिक इव्हेंटमध्ये हे दोघं एकत्र देखील दिसले आहेत,आणि त्यांच्यातील जवळीकता कॅमेऱ्याच्या नजरेपासून लपलेली नाही.
Web Title: Athiya Shetty Breaks Silence On Reports Of Her Wedding With Boyfriend Kl
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..