
Laal Singh Chaddha: पेनकिलर्स खाऊन आमिरनं अख्खा सीक्वेन्स शूट केला,कारण...
बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून आमिर खानला(Aamir Khan) ओळखलं जातं. कोणताही सिनेमा बनवताना तो खूप वेळ घेऊन करतो. अर्थात यामागे त्याचा रिसर्च खूप मोठा असतो. सध्या सगळ्यांना आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' ची प्रतिक्षा आहे. सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे आणि प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन आमिरचा सिनेमा पाहण्यास उत्सुक आहे. सिनेमात आमिर खान 'लाल सिंग चड्ढा'ची व्यक्तिरेखा साकारत आहे. जो आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये काम करताना दिसेल. यामधीलच एक क्रॉस कंट्री रनर देखील आहे. यासाठी तयारी करताना आमिरला गंभीर दुखापत झाली होती.(Aamir Khan Continues Shoot For 'Laal Singh Chaddha' With Pain Killers)
हेही वाचा: वयाच्या ८० व्या वर्षी अमिताभ बच्चन यांचे गुजराती सिनेमात पदार्पण
'लाल सिंग चड्ढा' सिनेमाच्या एका सीक्वेन्समध्ये आमिर खूप वेळा धावताना दिसणार आहे. धावण्याचा हा सीन जेवढा रोमांचक दिसणार आहे,तेवढाच हा शूट करताना आमिरला खूप अडचणींचा सामना करावा लागला. सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या आमिरला शूटिंग साठी आपल्या शारिरीक मर्यादांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली आहे. आमिर खाननं जेव्हा सिनेमातील या लॉन्ग रनिगं सीक्वेन्सचे शूटिंग केले तेव्हा त्याच्या गुडघ्याला जबरदस्त मार लागला होता. इतक्या सगळ्या दुखापतीतून तो जात असताना देखील आमिर मागे हटला नाही. यादरम्यान आमिरनं खूप साऱ्या पेनकीलर्स खाल्ल्या आहेत,म्हणजे धावताना त्याला गुडघ्याचं दुखणं जाणवणार नाही,आणि त्याला आराम देखील वाटेल.
हेही वाचा: शूटिंग अर्धवट सोडून शाहरुखच्या 'डंकी' मधून महत्त्वाच्या व्यक्तीची एक्झिट
आपण सगळेच विचार कराल एवढं दुखत असताना तो सीक्वेन्स शूट करायचाच कशाला,एवढं धावायचच कशाला? तर याचं कारण होतं कोरोनाचा उद्रेक. कोरोनामुळे 'लाल सिंग चड्ढा'च्या शूटिंगला आधीच खूप उशीर झाला होता. अशामध्ये आमिरला आपल्यामुळे शूटिंगमध्ये परत उशीर व्हावा असं मुळीच वाटत नव्हतं. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करत त्याने आपला बेस्ट शॉट दिला. 'लाल सिंग चड्ढा' सिनेमातला रनिंग सीक्वेन्स सिनेमातील सगळ्यात प्रसिद्ध सीन्स पैकी एक आहे.
हेही वाचा: टायगर श्रॉफसोबतच्या 'त्या' अफवेला रश्मिका मंदानानं केलं कन्फर्म, चाहते खूश
आमिर खान प्रॉडक्शन्स,किरण राव,वायकॉम १८ स्टुडियोच्या प्रॉडक्शन अंतर्गत बनलेला 'लाल सिंग चड्ढा' या सिनेमात करिना कपूर खान,मोना सिंग आणि नागा चैतन्य देखील आहेत. हा सिनेमा हॉलीवूडच्या 'फॉरेस्ट गम्प' सिनेमाचा रीमेक आहे. 'लाल सिंग चड्ढा' ११ ऑगस्ट २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे.
Web Title: Aamir Khan Continues Shoot For Laal Singh Chaddha With Pain
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..