Athiya Shetty: वडील सुनील शेट्टीचा खुलासा, राहुल आणि अथियाचे लग्न होणार साध्या पद्धतीने

अथिया शेट्टी आणि टीम इंडियाचा स्टार सलामीवीर केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दोघे एकत्र येऊ शकतात.
Athiya Shetty and KL Rahul
Athiya Shetty and KL RahulSakal

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी आणि टीम इंडियाचा स्टार सलामीवीर केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दोघे एकत्र येऊ शकतात, असे वृत्त आहे. दरम्यान, अभिनेत्री तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त दिसली होती, जिथे ती लोकप्रिय फॅशन डिझायनरच्या घरी दिसली.

अलीकडेच अथिया शेट्टीला तिचा भाऊ अहान शेट्टीसोबत पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केली होती. लग्नाच्या तयारीत दोघेही प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या घराच्या बाहेर निघताना दिसले होते. इंस्टाग्रामवर एका पापाराझी अकाऊंटने अथिया आणि अहानचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. क्लिपमध्ये, अभिनेत्री कारमध्ये बसलेली दिसत होती तर तिचा भाऊ कारमध्ये येण्यापूर्वी हसत होता आणि पापाराझीसाठी पोज देत होता.

Athiya Shetty and KL Rahul
Gandhi - Godse: "रस्त्यावर उतरून भेळपूरी खायला जाल तरी वाद होतील"

बातमीनुसार, लव्हबर्ड्सने लग्नाच्या फंक्शनसाठी 21 ते 23 जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे. या लग्नात फक्त कुटुंब आणि जवळचे लोक सहभागी होणार आहेत. याशिवाय सुनील शेट्टीच्या घरी सर्व कार्यक्रम होणार असल्याच्या बातम्या आहेत. अशा परिस्थितीत या बहुचर्चित जोडप्याच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले असून, त्यासाठी तयारी जोरात सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार असे देखील कळले आहे की या जोडप्याचे लग्न दक्षिण भारतीय पद्धतीने होणार आहे. त्यात प्री-वेडिंगच्या फंक्शन्सपासून ते हळद, मेहंदी आणि संगीत या सर्व महत्त्वाच्या विधींचा समावेश होतो. केएल राहुलने आपल्या खास दिवसासाठी भारतीय संघातून आधीच सुट्टी घेतली आहे. अथियाचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनी मीडियाला सांगितले होते की, दोघे लवकरच लग्न करणार आहेत. दोन्ही कुटुंबीयांकडून लग्नाची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com