अतुल कुलकर्णीचा मोजक्या शब्दांत विक्रम गोखलेंना टोला? | Vikram Gokhale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Gokhale and Atul Kulkarni

अतुल कुलकर्णीचा मोजक्या शब्दांत विक्रम गोखलेंना टोला?

देशाच्या स्वातंत्र्याबाबत अभिनेत्री कंगना राणावतने Kangana Ranaut केलेल्या वादग्रस्त विधानांवरून देशभर तीव्र पडसाद उमटत असताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले Vikram Gokhale यांनी रविवारी तिच्या वक्तव्याचं समर्थन केलं. यावरून पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आहे. कंगना राणावत Kangana Ranaut म्हणाली ते खरं आहे, अशा शब्दांत गोखले यांनी समर्थन केलं. स्वातंत्र्य मिळवण्यााचा प्रयत्न करणाऱ्या योद्धांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. अभिनेता अतुल कुलकर्णीने नुकतंच एक ट्विट केलं असून त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी विक्रम गोखलेंना टोला लगावल्याचं म्हटलं जात आहे.

वय आणि शहाणपण या दोन भिन्न गोष्टी आहेत, असं ट्विट अतुल कुलकर्णीने केलं आहे. अतुलने त्याच्या ट्विटमध्ये विक्रम गोखलेंना उल्लेख केला नसला तरी अप्रत्यक्षपणे त्याने टोला मारल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 3: 'हा' लोकप्रिय स्पर्धक पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार?

ब्राह्मण महासंघातर्फे अमृतमहोत्सवानिमित्त गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखले यांनी राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राजकारणातील खेळ इतक्या विचित्र स्तरावर पोहोचले आहेत की, त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठी माणूस भरडला जात आहे. संकटाच्या कड्यावरून देशाला मागे खेचायचं असेल आणि हे चुकलेलं गणित सुधारायचं असेल तर भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

loading image
go to top