'हा' लोकप्रिय स्पर्धक पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार? | Bigg Boss Marathi 3 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss marathi season 3

Bigg Boss Marathi 3: 'हा' लोकप्रिय स्पर्धक पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार?

Bigg Boss Marathi 3 बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. शोच्या नवव्या आठवड्यात अवघे दहा स्पर्धक घरात राहिले आहेत. बिग बॉसच्या घरात काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री नीथा शेट्टीने Neetha Shetty वाईल्ड कार्डद्वारे एण्ट्री केली होती. मात्र अवघ्या काही दिवसांतच तिला घराबाहेर पडावं लागलं. नीथा फक्त दोन आठवडे बिग बॉसच्या घरात होती. त्याआधी वाईल्ट कार्डद्वारे आलेल्या आदिश वैद्यचीही Adish Vaidya घरातून एग्झिट झाली. तोसुद्धा फक्त दोन आठवडेच बिग बॉसच्या घरात होता. आता या घरात आणखी एक सदस्य परतणार असल्याचं कळतंय.

बिग बॉसच्या घरातून सर्वांत पहिला स्पर्धक बाहेर पडला, तो म्हणजे अक्षय वाघमारे. त्याने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिलं असून त्यावर प्रेक्षकांचं मत विचारलं आहे. 'वाईल्ड कार्डद्वारे सहभागी झालेले दोन्ही सदस्य दोन आठ्वड्यात घराबाहेर पडले. नवीन वाईल्ड कार्ड एण्ट्रीपेक्षा घराबाहेर पडलेल्यांपैकी काही सदस्यांना पुन्हा संधी मिळाली तर..काय वाटतं तुम्हाला,' असा प्रश्न त्याने प्रेक्षकांना विचारला आहे.

हेही वाचा: "..तेव्हा हिंदू खलनायक का खटकले नाहीत?"; रोहित शेट्टीचा सवाल

अक्षयच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्यालाच पुन्हा घरात जाण्याचं मत नोंदवलं आहे. 'तुला पुन्हा बिग बॉसच्या घरात पहायला आवडेल', असं एकाने लिहिलं. तर 'अक्षय आणि आदिशला परत आणा', अशी मागणी दुसऱ्याने केली आहे. याविषयी 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, "अनेकांनी मला बिग बॉसच्या घरात पुन्हा जाण्याचा सल्ला दिला. घरातून मी खूप लवकर बाहेर पडलो, त्यामुळे त्यांना मला पुन्हा घरात पहायचं आहे. बघू पुढे काय होतंय."

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनने ५५ दिवस पूर्ण केले आहेत. या ५५ दिवसांत दोन वाईल्ड कार्ड एण्ट्री दोन आठवड्यांतच बाद झाले. त्यामुळे आता घरातील बाहेर पडलेलाच सदस्य पुन्हा येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

loading image
go to top