Atul Parchure Cancer: लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांना कॅन्सर, लग्नाच्या 25 व्या वाढदिवशीच..

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता अतुल परचुरे यांना कॅन्सर झाल्याची बातमी समोर येत आहे
Atul Parchure diagnosed with cancer a popular marathi actor
Atul Parchure diagnosed with cancer a popular marathi actorSAKAL

Atul Parchure Cancer News: मराठी मनोरंजन विश्वातुन एकामागोमाग एक धक्कादायक बातमी समोर येत आहेत. काही दिवसांपुर्वी सुलोचना दीदींचं निधन झालं. आज ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड गेले.

आणि आता मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता अतुल परचुरे यांना कॅन्सर झाल्याची बातमी समोर येत आहे. अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केलाय.

(Atul Parchure diagnosed with cancer a popular marathi actor)

Atul Parchure diagnosed with cancer a popular marathi actor
Prajakta Mali: प्राजक्ताने भलंमोठं कर्ज काढून घेतलं 'या' ठिकाणी घर, आलिशान घराची झलक बघा

लग्नाचा २५ वा वाढदिवस आणि कॅन्सरचे निदान

अतुल परचुरे लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी न्यूझीलँडला गेले होते. तिथे त्यांची अन्नपदार्थ खाण्याची वासना उडाली होती. खायचं म्हटलं की त्यांना जीवावर येई. यानंतर काही दिवसांनी परचुरेंना कावीळ झाली.

पुढे डॉक्टर मित्राच्या सांगण्यावरुन त्यांनी सोनोग्राफी केली. डॉक्टरांचे चेहऱ्यावरचे भाव बघता कावीळ पेक्षा काहीतरी गंभीर आजार झालाय, असं अतुल यांना मनोमन जाणवलं.

युट्यूबवरच्या ‘मित्र म्हणे’ पॉडकास्ट या कार्यक्रमात सौमित्र पोटेंनी घेतलेल्या मुलाखतीत अतुल परचुरे यांनी या गोष्टीचा खुलासा केला.

Atul Parchure diagnosed with cancer a popular marathi actor
Ravindra Mahajani : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन, घरात आढळला मृतदेह; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

डॉक्टरांची चुकीची ट्रीटमेंट आणि कुटूंबाचा आधार

अतुल परचुरे दुसऱ्या दिवशी जेव्हा सिटी स्कॅन करण्यासाठी डॉक्टरांकडे गेले तेव्हा सिटी स्कॅन केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, उद्या आपण MRCP करु.

त्यानंतर काही टेस्ट केल्यानंतर डॉक्टर परचुरेंना म्हणाले, की लिव्हरमध्ये आम्हाला एके ठिकाणी ट्युमर दिसतो आहे. हा ट्युमर साधारण पाच सेमीचा आहे. डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगीतले.

पुढे डॉक्टरांनी कॅन्सर स्पेशलिस्टला भेटा असं परचुरेंना सांगीतलं. पुढे मग ट्युमर झालाय याचं निदान झालं. घरी आल्यानंतर परचुरेंनी सर्वात आधी आईला ही गोष्ट सांगितलं.

परचुरे आईला म्हणाले.. डॉक्टर म्हणत आहेत की दोन-तीन प्रोसिजर्स आहेत ते झालं की तुमच्या लिव्हरची साईझ वाढेल मग आपण ते काढून टाकू.

आईने हे ऐकल्यावर काळजी करु नकोस असं सांगीतलं. पुढे बायचको सोनियाला कॅन्सर झाल्याचं सांगितलं तेव्हाही बायकोने अतुलला धीर दिला.

या मुलाखतीत अतुल म्हणाले.. त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली की तुमची कशावर तरी श्रद्धा हवी. मग ती पुस्तकावर असो, देवावर असो, स्वामी समर्थांवर असो, येशूवर, अल्लावर कुणावरही असो पण ती हवी आणि १०० टक्के हवी.

माझी आई, बायको आणि माझी मुलगी या माझ्या तीन सपोर्ट सिस्टिम आहेत. माझी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. या संपुर्ण काळात अतुल यांना कुटूंबाने सपोर्ट केला. अतुल यांनी कॅन्सरशी यशस्वी लढा दिलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com