Avatar 2 : 'असा चित्रपट होणे नाही!' अवतार 2 पाहिल्यावर समीक्षक भारावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Avatar 2 the way of water

Avatar 2 : 'असा चित्रपट होणे नाही!' अवतार 2 पाहिल्यावर समीक्षक भारावले

Avatar 2 the way of water Hollywood director James Cameron movie London premier: जगप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांच्या अवतार द वे ऑफ वॉटरचा प्रीमिअर लंडनमध्ये पार पडला. त्यावेळी उपस्थित असलेल्या अनेक सेलिब्रेटींनी हा चित्रपट पाहिल्यानंतर उस्फुर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. तब्बल तेरा वर्षानंतर कॅमेरुन यांच्या अवतारचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. आता तर समीक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ती आणखी वाढली आहे.

कॅमेरुन यांनी अतिशय परिश्रमपूर्वक, संयमानं आणि चिकाटीनं अवतारचे धनुष्य पेललं असून चित्रपटातील कथेला त्यांनी पूर्णपणे न्याय दिल्याचे समीक्षकांनी म्हटले आहे. जबरदस्त ग्राफीक्स, खिळवून ठेवणारी सिनेमॅटोग्राफी, प्रभावी दिग्दर्शन आणि भारावून टाकणारे संगीत यांचा अनोखा मिलाफ कॅमेरुन यांच्या अवतारच्या दुसऱ्या पार्टमध्ये पाहायला मिळतो. हे शब्द आहेत लंडनमधील समीक्षकांचे. सध्या सोशल मीडियावर अवतारवरुन वेगवेगळया प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यावर सुरु असणाऱ्या चर्चेमध्ये नेटकरी सहभागी होत आहेत.

हेही वाचा - Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

अवतारच्या प्रीमिअरला समीक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अविश्वसनीय, अद्भुत आणि चत्मकारिक अशा शब्दांनी अवतारविषयी बोलावे लागेल. असे अनेक समीक्षकांचे म्हणणे आहे. अवतारच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. भारतातील प्रेक्षकांना देखील या चित्रपटाचं मोठं कौतूक असल्याचे दिसून आले आहे. एका समीक्षकानं ट्विटमध्ये लिहिलं आहे की, मी जे काही पाहिलं ते भलतंच अद्भुत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, कॅमेरुन हे त्यांना जे सांगायचे आहे त्यामध्ये यशस्वी झाले आहेत. त्यांनी भारावून टाकले आहे.

अवतार केवळ मनोरंजन करत नाही तर त्यापलीकडे जाणारा चित्रपट आहे. वेगवेगळ्या मानवी भावनांचे चित्रण तो प्रभावीपणे करतो. त्यामुळे सुजाण प्रेक्षकांनी अवतारच्या वाटेला जरुर जावे. कॅमेरुन यांची गोष्ट सांगण्याची पद्धत ही भलतीच प्रभावी आहे. आपण एक प्रेक्षक म्हणून त्यामध्ये गुंतून जातो. असा चित्रपट पुन्हा होणे नाही. या शब्दांत त्याचे वर्णन करावे लागेल. अशा प्रतिक्रिया समीक्षकांकडून येत आहेत.

हेही वाचा: Akshay Kumar: 'बल्ब कुठून आला? नीट चाल जरा!' अक्षयच्या लूकवर सडकून टीका

२००९ मध्ये अवतारचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. तो देखील जगभरामध्ये प्रचंड गाजला. प्रेक्षकांनी कॅमेरुनचे वारेमाप कौतूक केले होते. आपल्या एकाच चित्रपटासाठी तब्बल दहा वर्षांहून अधिक काळ मेहनत घेणाऱ्या कॅमेरुन यांच्या चित्रपटांचा खास प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळेच की काय त्यांच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात. काही दिवसांपूर्वी अवतार २ द वे ऑफ वॉटरचा ट्रेलर व्हायरल झाला होता. त्याला मिळालेला प्रतिसादही भन्नाट होता. आता तर त्याच्या खास प्रिमिअरला उपस्थित असलेल्या जगभरातील समीक्षकांनी अवतारवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. १६ डिसेंबरला अवतार हा भारतात पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: Akshay Kumar: अक्षय झाला छत्रपती शिवाजी महाराज!