'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'ने तोडला 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 April 2019

'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' हा हॉलिवूडपट भारतात 2845 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडच्या मोठ-मोठ्या चित्रपटांपेक्षा अधिक स्क्रिन्स 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'ला मिळाल्या आहेत.
 

मार्वल स्टुडिओ प्रस्तुत 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' हा हॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांनी बराच डोक्यावर उचलला आहे. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी या चित्रपटात 50 कोटींची कमाई केली आणि दुसऱ्या दिवशीही इतकाच गल्ला जमवत 100 कोटींपर्यंत मजल मारली आहे. 

भारतात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'ने विक्रम नोंदवला. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर दिलेल्या आकडेवारीनुसार, 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'ने पहिल्याच दिवशी 53.10 कोटी रूपयांचा बिझनेस केला. तर दुसऱ्या दिवशी कमाईत थोडी घट होत चित्रपटाने 51.40 कोटी कमावले. चित्रपटाच्या दोन दिवसांच्या कमाईचा एकूण आकडा 124.40 कोटींवर पोहोचला.

'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' हा हॉलिवूडपट भारतात 2845 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडच्या मोठ-मोठ्या चित्रपटांपेक्षा अधिक स्क्रिन्स 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'ला मिळाल्या आहेत.

'बाहुबली 2'चा रेकॉर्ड क्रॉस : 
एस. एस. राजमौली दिग्दर्शित 'बाहुबली 2'ने पहिल्या तीन दिवसांत 100 कोटींची कमाई केली होती. पण 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'ने दोनचं दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avengers Endgame earns above hundred crore in two days of releasing in India