आयुषमानचा नवा अवतार पाहिला का? खलनायकी भूमिका साकारणार की काय..?

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 6 June 2020

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. कुणी आपले विविध फोटो शेअर करीत आहेत तर कुणी व्हिडीओ टाकीत आहेत.

मुंबई ः हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. कुणी आपले विविध फोटो शेअर करीत आहेत तर कुणी व्हिडीओ टाकीत आहेत. सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू असतो. त्यांचे चाहतेदेखील आपल्या कलाकारांचे नेमके काय बरे चालले आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

वाचा ः लॉकडाऊनवर भाष्य करणाऱ्या 'उठेंगे हम' चित्रफितीचा डिजिटल प्रीमियर

आता अभिनेता आयुषमान खुरानाने आपला जोकर अवतारातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यामुळे आता तर्कवितर्काना उधाण आले आहे. आयुषमान आता खलनायकी भूमिका साकारणार की काय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. आयुषमान खुरानाने हिंदी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका केल्या आणि अल्पावधीतच त्याला स्टारडम प्राप्त झाले. त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट यशस्वी झाले. 

वाचा ः अरे वाह! मान्सूनसाठी कोंकण रेल्वे सज्ज; लवकरच लागू होणार वेळापत्रक.. 

सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील चलते खणखणीत नाणे म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. सध्या लॉकडाऊनच्या काळात तो सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतो. आता त्याने जोकरच्या रुपातील फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने सगळेच अचंबित झाले आहेत. कारण जोकर हा सर्वाधिक लोकप्रिय खलनायकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. बॅटमन या कॉमिक्साठी ही व्यक्तिरेखा बनविण्यात आली आणि त्यानंतर त्यावर चित्रपटदेखील आले. त्या चित्रपटांना ऑस्करही मिळाले. एकूणच मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेली ही खलनायकी व्यक्तिरेखा आहे आणि तीच आयुषमानला साकारण्याची इच्छा आहे की काय असे या फोटोवरून वाटते. त्या फोटोमध्ये त्याने अशी कॉमेंट्स लिहिली आहे.

वाचा ः आपल्या मुलाशी व्हि़डीओ कॉलवर बोलण्यासाठी चक्क घ्यावी लागली न्यायालयाची मदत! वाचा बातमी सविस्तर

'मी एखाद्या योजनेसारख्या माणसासारखा दिसत आहे का..? तुला माहीत आहे मी काय आहे मी काय आहे? मी असा का आहे? गाड्यांचा पाठलाग करणारा मी एक कुत्रा आहे. मला माहित नाही मला काय करायचंय, कारण मी अराजकता पसरवणारा व्यक्ती आहे. मला जोकर सारखी एखादी थक्क करणारी व्यक्तिरेखा साकारायची आहे.' असंही त्याने म्हटले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayushman khurana gets in new avatar of villain or joker