ट्रेनमध्येच रंगली आयुषमान- नीना गुप्तांची मैफल; व्हिडिओ व्हायरल...Neena Gupta | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayushmann Khurrana And Neena Gupta Video Viral

ट्रेनमध्येच रंगली आयुषमान- नीना गुप्तांची मैफल; व्हिडिओ व्हायरल...

बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता(Neena Gupta) यांनी एक मजेशीर व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्यासोबत आयुषमान खुराना(Ayushmann Khurrana),गजराज राव,जितेंद्र कुमार यांच्यासोबत अनेक कलाकार दिसत आहेत. हे सगळे एकाच ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. बरं इतकच नाही तर ढोल बडवत गातानाही दिसत आहेत बरं का. हा व्हिडीओ आहे २०२० साली प्रदर्शित झालेल्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या सिनेमातील. ज्यामध्ये आयुषमान ढोल वाजवत आहे आणि पूर्ण टीम त्याच्यासोबत 'रमैया वस्तावैय्या' या गाण्यावर गाताना दिसत आहे.

हेही वाचा: पत्रकार मारहाणी प्रकरणात सलमान खानला 13 जूनपर्यंत हायकोर्टाचा दिलासा

नीना गुप्ता यांनी ही आठवण व्हि़डीओच्या माध्यमातून शेअर केली आहे. या व्हिडीओत जिथे सिनेमाची टीम एकत्र गात,मजा-मस्ती करताना दिसत आहे,तिथे दुसरीकडे ट्रेनमधील इतर प्रवासी सीटवरुन उठून लांबूनच या स्टार्सचा आनंद घेत आहेत. तर काही प्रवासी या फिल्मी सिताऱ्यांना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात मग्न आहेत. नीना गुप्ता,आयुषमान खुराना आणि गजराज राव यांनी एकत्र 'बधाई हो' सिनेमात काम केलं आहे. या सिनेमाचं कथानक खूपच हटके होतं. जिथे एका दाम्पत्याच्या मोठ्या मुलाचं लग्न ठरतय त्यावेळी त्यावयात ते दाम्पत्य एका बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतात. यावेळी त्यांना आपल्या कुटुंबातील सर्वांच्या टोमण्यांचा सामना करावा लागतो. 'बधाई हो' सिनेमाचं दिग्दर्शन अमित शर्मानं केलं होतं आणि या सिनेमाचं कथानक प्रेक्षकांना खूप भावलं देखील होतं.

तर याच कलाकारांचा एकत्रित असा आनंद एल राय निर्मित आणि हितेश केवल्या दिग्दर्शित 'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमा जो समलैंगिक संबंधांवर आधारित होता. या सिनेमात समलैंगिक संबंध असलेल्या कपलच्या नात्यातील हतबलता आणि संघर्ष दाखवण्यात आला होता. या सिनेमात आयुषमान खुराना आणि अमन त्रिपाठी यांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या.

Web Title: Ayushmann Khurrana And Neena Gupta Travelled By Trainvideo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top