पत्रकार मारहाणी प्रकरणात सलमान खानला 13 जूनपर्यंत हायकोर्टाचा दिलासा Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan

पत्रकार मारहाणी प्रकरणात सलमान खानला 13 जूनपर्यंत हायकोर्टाचा दिलासा

२०१९ मध्ये सलमान खाननं(Salman Khan) पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी त्याला अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टानं समन्स बजावल होतं. यासंदर्भात सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डला अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात ५ एप्रिल,२०२२ पर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण तेव्हा सलमाननं मदतीसाठी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सलमानला हायकोर्टातून दिलासा मिळाला होता आणि त्यामुळे अभिनेता व त्याचा बॉडीगार्ड यांची कोर्टाची फेरी टळली होती. आता बातमी आहे की मुंबई हाय कोर्टानं सलमान खानला मॅजिस्ट्रेट कोर्टानं जारी केलेल्या समन्सवरची स्थगिती १३ जूनपर्यंत कायम ठेवली आहे. त्यामुळे तुर्तास तरी सलमानला दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: Lockupp: नवी वॉर्डन तेजस्वी प्रकाश; 'फाटक्या' पण हटके ड्रेसमध्ये दिसली हॉट

हे नेमकं प्रकरण काय ते थोडक्यात समजून घेऊया. २०१९ मध्ये एके सकाळी सलमान आपल्या सायकल वरुन फेरफटका मारायला निघालेला होता. तेव्हा त्याचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकाराला व त्याच्यासोबतच्या फोटोग्राफरला सलमान व त्याच्या बॉडीगार्डंन धक्काबुक्की केली होती. यामध्ये पत्रकाराच्या कॅमेऱ्याला देखील नुकसान पोहोचलं होतं,मोबालई तोडण्यात आला होता. पत्रकार असलेल्या अशोक पांडेनं तेव्हा अंधेरी येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यासंदर्भातच सलमान व त्याच्या बॉडीगार्डला कोर्टात हजर राहण्याचे आदेश मॅजिस्ट्रेट कोर्टानं दिले होते. पण सलमाननं हाय कोर्टात आव्हान दिल्यानंतर त्याच्या विरोधात जारी केलेल्या समन्सवर स्थगिती आणली गेली होती. ५ एप्रिल,२०२२ ते ५ मे,२०२२ अशी ती स्थगिती होती पण आज हाय कोर्टानं १३ जून,२०२२ पर्यंत ती स्थगिती वाढवून सलमान खानला मोठा दिलासा दिला आहे.

हेही वाचा: कोण भंग करतय देशाची शांती? 'अनेक'च्या ट्रेलरमधून आयुषमानचा मोठा खुलासा

बोललं जात आहे की या समन्स विरोधात सलमान खानचा बॉडीगार्ड शेख यांनं देखील याचिका दाखल केली होती. आज त्यावर न्यायमूर्ती एन.जे.जमादार यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या सुनावणीनंतरच सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्डविरोधात जारी केलेल्या समन्सवर १३ जुनपर्यंत स्थिगती आणल्याचं बोललं जात आहे.

Web Title: Hc Extends Stay On Summons To Salman Khan Till June

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top