esakal | 'बाहुबली'मधील पात्रांच्या कपाळावरील टिळ्यांचे रंजक अर्थ

बोलून बातमी शोधा

'बाहुबली'मधील पात्रांच्या कपाळावरील टिळ्यांचे रंजक अर्थ
'बाहुबली'मधील पात्रांच्या कपाळावरील टिळ्यांचे रंजक अर्थ
sakal_logo
By
स्वाती वेमूल
'बाहुबली'मधील पात्रांच्या कपाळावरील टिळ्यांचे रंजक अर्थ

चित्रपटसृष्टीच्या इतिहासात 'बाहुबली' या चित्रपटाला एक वेगळंच महत्त्व आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. 'बाहुबली : द कन्क्लुजन' या चित्रपटाला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने या चित्रपटाच्या पात्रांमधील प्रत्येकाच्या कपाळावरील टिळ्याचा अर्थ काय आहे, ते पाहुयात..

'बाहुबली'मधील पात्रांच्या कपाळावरील टिळ्यांचे रंजक अर्थ

अमरेंद्र बाहुबली- अमरेंद्र बाहुबलीच्या कपाळावर अर्धचंद्र पाहायला मिळालं. अर्धचंद्राला अनेक धर्मांमध्ये पवित्र मानलं जातं. रयतेवर भरपूर प्रेम करणारा पण प्रसंगी रागावणारा असं व्यक्तिमत्त्व दाखवण्यासाठी अर्धचंद्राचा टिळा दाखवण्यात आला आहे.

'बाहुबली'मधील पात्रांच्या कपाळावरील टिळ्यांचे रंजक अर्थ

महेंद्र बाहुबली- चित्रपट महेंद्र बाहुबली म्हणजेच शिवुडू हा शंकराचा भक्त दाखवण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या कपाळावर सर्प आणि शंखाचा टिळा दाखवण्यात आला आहे.

'बाहुबली'मधील पात्रांच्या कपाळावरील टिळ्यांचे रंजक अर्थ

भल्लालदेव- भल्लालदेवच्या कपाळावर उगवत्या सूर्याचा टिळा दाखवण्यात आला. सूर्याप्रमाणेच तळपता म्हणजेच तापट स्वभावाचा भल्लालदेव असल्याने त्याच्या कपाळावर सूर्य दाखवण्यात आला आहे.

'बाहुबली'मधील पात्रांच्या कपाळावरील टिळ्यांचे रंजक अर्थ

देवसेना- सुंदरता, प्रेमळ या गुणांसोबतच देवसेना धाडसी आणि निडर आहे. म्हणून स्त्री आणि पुरुष या दोघांच्या गुणांचा मेळ दाखवणारी टिकली तिला दाखवण्यात आली.

'बाहुबली'मधील पात्रांच्या कपाळावरील टिळ्यांचे रंजक अर्थ

अवंतिका- देवसेनेला भल्लालदेवाच्या जाचातून मुक्त करण्याचं ध्येय बाळगणाऱ्या अवंतिकाने स्वत:लाच शस्त्रासारखं बनवलं आहे. त्यानुसार तिच्या कपाळावर नक्षी गोंदवण्यात आली आहे.

'बाहुबली'मधील पात्रांच्या कपाळावरील टिळ्यांचे रंजक अर्थ

शिवगामी- शिवगामीच्या कपाळावर असलेली मोठी पूर्ण गोल टिकली ही तिच्या भारदस्त व्यक्तीमत्त्वाचं दर्शन घडवते.

'बाहुबली'मधील पात्रांच्या कपाळावरील टिळ्यांचे रंजक अर्थ

कटप्पा- अत्यंत निष्ठावान आणि प्रामाणिक सेवक म्हणून कटप्पाची ओळख आहे. म्हणून त्याचा टिळादेखील त्याच पद्धतीने दाखवण्यात आला आहे.