esakal | 'आमीर खानच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत आहे का?'
sakal

बोलून बातमी शोधा

aamir khan

'आमीर खानच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत आहे का?'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - योग गुरु रामदेव बाबा (baba ramdev) त्यांच्या डॉक्टरांवरील वक्तव्यामुळे प्रसिध्दीच्या झोतात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रामदेव बाबा सोशल (ramdeb baba trending on social media) मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळात आयएमए (इंडियन मेडिकस असोशिएशन) आणि फार्मा कंपनी यांच्याविरोधात काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यात त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या त्या पत्रात डॉक्टरांना 25 प्रश्न विचारले होते. याशिवाय काही आजारांविरोधातही प्रश्न विचारुन वाद निर्माण केला होता. ( baba ramdev controversy Shared old video of aamir khan asked ifhave courage to speak him)

आता रामदेव बाबांनी अॅलोपॅथी उपचार पध्दती (allopathy treetment) आणि अॅलोपॅथीचा (allopathy) उपयोग करणारे डॉक्टर यांच्यावर टीका करण्यासाठी बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता आमीर खानचा (aamir khan) आधार घेतला आहे. त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाबा रामदेव आपली भूमिका मांडताना दिसत आहे. त्यांनी आता अॅलोपॅथी उपचार पध्दतीचा उपयोग करणा-या डॉक्टरांना सांगितले आहे की, तुमच्यात हिंमत असेल तर आमीर खानवर गुन्हा दाखल करुन दाखवा.

आमीरविरोधात मोर्चा काढण्याची हिंमत आहे का ? असा प्रश्न रामदेव बाबांनी उपस्थित केला आहे. या व्हिडिओमध्ये आमीर खान यांनी डॉ. समित शर्मा (sachit sharma) यांची अॅलोपॅथी आणि औषधोपचार पध्दती यावर मुलाखत घेतली होती. त्यात सचित शर्मा म्हणाले होते की, या औषधांची किंमत खर तर फार कमी असते. मात्र आपण ज्यावेळी त्या बाजारात विकत घेतो तेव्हा त्याची किंमत जास्त होते. ती किंमत पाच ते दहापट वाढते.

हेही वाचा: 'मी म्हणजे कुटूंब असं त्यांना कधीही वाटलं नाही'

हेही वाचा: Aai Kuthe Kay Karte:मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही;पाहा व्हिडिओ

शर्मा यांनी त्या व्हिडिओ मध्ये सांगितले होते की, भारतामध्ये चाळीस कोटी लोक असे आहेत की ज्यांना दोनवेळचे जेवण मिळत नाही. ते औषधे कसे खरेदी करणार, त्यावेळी आमीर खान म्हणतो, यात अनेक लोकं अशी आहेत की ज्यांना औषधे घेता येत नाही.

loading image