esakal | 'मी म्हणजे कुटूंब असं त्यांना कधीही वाटलं नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

actress shurti haassan

'मी म्हणजे कुटूंब असं त्यांना कधीही वाटलं नाही'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून लोकप्रिय असणारी अभिनेत्री श्रृती हसन (south actress shruti haasan ) तिच्या वेगळ्या भूमिकेसाठी प्रसिध्द आहे. ती सोशल मीडियावर (social media) अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी म्हणूनही प्रख्यात आहे. सामाजिक कामांमध्ये भाग घेणारी श्रृती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही तितक्याच परखडपणे भूमिका घेत असते. त्यामुळे ती तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. आता ती चर्चेत आली आहे याला कारण म्हणजे तिनं तिच्या कुटूंबाविषयी केलेले विधान. याचा परिणाम आपल्यावर कशाप्रकारे झाला हे तिनं सांगितलं आहे. (south actress shruti haasan interview she said My own family felt like it didnot belong only me)

बॉलीवूडमध्ये (bollywood) तिनं काही फार काम केलेलं नाही. मात्र तरीही तिचे नाव बॉलीवूडमध्येही चर्चेत असते. श्रृती तिच्या मदतशील (helping nature) स्वभावासाठीही ओळखली जाते. कोरोनाच्या काळात तिनं अनेक व्यक्तींना मदतीतीचा हात दिला आहे. श्रृतीनं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याबद्दल ती म्हणते, मला वाईट वाटते जेव्हा आपण एखाद्या महिलेवर वाट्टेल तशी कमेंट करतो. आणि तिला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी आपण काय करत आहोत हे आपल्या लक्षात य़ेत नाही.

सोशल मीडियावर महिलांविषयक ज्या बातम्या प्रसिध्द होतात तेव्हा वाईट वाटते. अनेकजण त्यावर आपआपल्या कमेंट देतात. त्या महिलेचा विचार करत नाही. जिच्यावर अशाप्रकारच्या कमेंट व्यक्त केल्या जातात. एक जागरुक नागरिक म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार तर करावा लागेल. मी नेहमीच समाजातील अशा गोष्टींपासून प्रेरणा घेते. त्यातून काही शिकून त्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करते.

महिलांवर होणा-या अत्याचाराबाबत श्रृतीनं आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यावर ती परखडपणे भूमिका मांडते. भारतात महिला सुरक्षित नाहीत. हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे असे मला वाटते. मी जेवढे जग फिरले आहे त्यातून मला त्या देशांमधील स्त्रियांना दिला जाणारा आदर, त्यांचे महत्व अधोरेखित करावेसे वाटते. आपल्या देशांमध्ये या गोष्टी मुळापासून बदण्याची गरज आहे. सद्यस्थितीला जर आपण पाहिले तर काय दिसते. याचा विचार ज्याचा त्याने करावा.

हेही वाचा: भाईजानची पाठराखण करत आकांक्षा पुरीचं KRK वर टीकास्त्र

हेही वाचा: Aai Kuthe Kay Karte:मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही;पाहा व्हिडिओ

मी माझ्या जीवनाची शिल्पकार आहे. मी ज्या कुटूंबात राहते त्यात मला स्वतंत्रपणाची शिकवणूक मिळाली आहे. समानता पहिल्यापासून आमच्याकडे होती. मी माझ्या वडिलांबरोबर अनेक गोष्टी शेअर करु शकते. त्यांनाही सामाजिक प्रश्नांची चांगली जाण असल्याचे श्रृतीनं यावेळी सांगितले.

loading image
go to top