esakal | 'तुमची जागा कुणीही घेऊ शकणार नाही'...

बोलून बातमी शोधा

irrfan khan

'तुमची जागा कुणीही घेऊ शकणार नाही'...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता इरफान खान याचं जाणं सर्वांसाठी वेदनादायी होतं. केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमध्येही त्याची लोकप्रियता मोठी होती. त्यामुळे त्याचा फॅन फॉलोअर्स जगभरात सगळीकडे होता. साचेबंद अभिनयाच्या सर्व चौकटी मोडीत काढून इरफाननं आपल्या अभिनयानं मोठं नाव कमावलं होतं. अजूनही त्याचे चित्रपट प्रेक्षक, चित्रपट अभ्यासक. समीक्षक यांच्या अभ्यासाचा विषय आहे. आज त्याची डेथ अॅनिव्हर्सरी आहे. त्यानिमित्तानं त्याच्या मुलानं सोशल मीडियावर काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्याला इरफानच्या फॅन्सनं प्रतिसाद दिला आहे.

आपल्या आवडत्या अभिनेत्याला त्यांनी आदरांजलीही वाहिली आहे. इरफान खानच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्याला मोठ्या प्रमाणावर श्रध्दांजलीही वाहण्यात आली आहे. त्याचा मुलगा बाबिलनं अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. त्यानिमित्तानं एक पोस्ट शेअर केली आहे. बाबिलनं म्ह्टलं आहे की, बाबा तुमची जागा कुणीही घेऊ शकत नाही. त्यापुढे त्यानं लिहिलं आहे की, मला माहिती आहे ज्यावेळी तुम्हाला कॅन्सर आहे असे कळले तेव्हा तुम्ही जराही विचलित झाला नाहीत. पुढे कॅन्सरवरील उपचार सुरु झाले तेव्हा किमो तुम्हाला आतून जाळत होता. ते सगळं तुमच्या चेह-यावर दिसत होतं. मी आता लिहायला सुरुवात केली आहे. मात्र अजून पर्यत असं काही शोधू शकलो नाही जे कागदावर चांगल्या पध्दतीनं आकार घेईल. त्याच्या शोधात आहे.

बाबा तुम्ही एकप्रकारचा मोठा वारसा आम्हाला दिला आहे. त्यामुळे त्याचा मी पुरेपूर उपयोग करुन घेणार आहे. यासगळ्यात एक मात्र नक्की की तुमची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. तुम्ही माझे चांगले मित्र होता आणि वडिलही. मी तुमच्यावर खुप प्रेम करतो. आणि नेहमीच तुमच्या आठवणींना जपून ठेवणार आहे. बाबिलच्या त्या पोस्टला इंस्टावर आतापर्यत 2 लाख जणांनी लाईक्स केलं आहे.

बॉलीवूडच्या काही अभिनेत्यांनीही इरफानला आदरांजली वाहिली आहे. अभिनेता इशान खट्टरनं लिहिलं आहे की, तुमच्याप्रती नेहमीच आदर आणि सन्मान. माझे वडिल हे माझ्यासाठी प्रेरणा होते. त्यांचे काम आजही सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे हे माझ्यासाठी खुप आनंदाची आणि समाधानाची बाब आहे.