'बालिका वधु' फेम सुरेखा सीकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा, ब्रेन स्ट्रोकमुळे आहेत आयसीयुमध्ये दाखल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 10 September 2020

सुरेखाजी यांना ब्रेक स्ट्रोक आल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर होती मात्र नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार त्यांच्या प्रकृतीत पहिल्यापेक्षा सुधारणा असल्याचं कळतंय. 

मुंबई- 'बालिका वधु' मालिकेतील दादी माँ सगळ्यांच्या चांगलीच लक्षात आहे. अभिनेत्री सुरेखा सीकरी यांनी 'बालिका वधु'सोबतंच अनेक मालिकांमध्ये केलेल्या त्यांच्या पात्रांमुळे त्या प्रेक्षकांच्या मनात आहेत.  नुकताच सुरेखाजी यांना ब्रेक स्ट्रोक आल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर होती मात्र नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार त्यांच्या प्रकृतीत पहिल्यापेक्षा सुधारणा असल्याचं कळतंय. 

हे ही वाचा: कंगना वादात आता अभिजीत भट्टाचार्य यांची उडी, खान अभिनेत्यांसोबतंच अजय देवगणवरही साधला निशाणा  

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी मुंबईच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये आहेत. त्या हॉस्पिटलच्या सगळ्यात उत्तम डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. अभिनेता सोनू सूदने सोशल मिडियावर एक पोस्ट करत सांगितलं आहे की सुरेखा यांना पहिल्यापेक्षा चांगलं वाटत आहे तसंच त्या सक्षम हाताखाली आहेत.

सुरेखा यांचे पीआरओ विवेक सिधवानी यांनी मिडियाला सांगितलं की 'सुरेखा यांची तब्येत आता ठिक आहे. मात्र त्या अजुनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की पुढचे काही दिवस हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. विवेक यांनी सुरेखा यांच्या आर्थिक परिस्थितीवाल्या बातमीवर नकार दिला आहे. त्यांनी सांगितलं की सुरेखा आर्थिक चणचणीतून जात नाहीयेत. त्यांच्या जवळच्या व्यक्ती त्यांची काळजी घेत आहेत. सुरेखा यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत जे त्या आधीपासूनंच त्यांच्या उपचारांवर खर्च करत आहेत. याशिवाय त्यांनी कधीच पैश्यांच्या मदतीची मागणी केलेली नाहीये. त्यांचे हितचिंतक त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.'

मंगळवारी सुरेखा यांना त्यांच्या घरी ज्युस पिताना अचानक ब्रेन स्ट्रोक आला. सुरेखा यांच्यासोबत २०१८ मध्ये देखील हे झालं होतं जेव्हा त्यांचा बधाई हो हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमा रिलीज झाल्याच्या एक महिन्यानंतरंच त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. आणि त्यांच्या अर्ध्या शरिराला थोड्या प्रमाणात लकवा मारला.तेव्हापासूनंच त्यांच्यासोबत एक नर्स असते.      

badhai ho actress surekha sikri health update she is still in icu  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: badhai ho actress surekha sikri health update she is still in icu