बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौली आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण

संतोष भिंगार्डे
गुरुवार, 30 जुलै 2020

बाहुबलीचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि त्यांच्या कुटुंबीयांची. बुधवारी राजामौली आणि त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

मुंबई ः  सर्वत्र कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून गेल्या चारेक महिन्यात चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि आता यातच भर पडली आहे ती म्हणजे बाहुबलीचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि त्यांच्या कुटुंबीयांची. बुधवारी राजामौली आणि त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. राजामौली यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी सांगितली. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

'अतरंगी रे' चित्रपटाच्या शुटींगसाठी 'ही' तीन शहरं झाली निश्चित, वाचा बातमी सविस्तर

राजामौली यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले, "माझ्या कुटुंबातील सदस्यांना आणि मला काही दिवसांपूर्वी थोडा ताप आला. तो आपणहून कमी झाला, पण तरीही आम्ही चाचणी केली. परिणामी आज आमच्या सर्वांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह दिसून आले आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार आम्ही होम क्वारंटाईन आहोत."
  राजामौली यांनी ट्विट केले की, “कोणतीही लक्षणे नसल्यामुळे आम्ही सर्वजण बरे आहोत. परंतु सर्व खबरदारी व सूचना पाळत आहोत आणि आता फक्त अँटीबॉडीज विकसित होण्याची वाट पाहात आहोत जेणेकरून आम्ही आमचा प्लाझ्मा दान करू शकू.”

Exclusive Interview : विद्याने सांगितला 'शकुंतला देवी'चा प्रवास..

    एस.एस. राजामौली हे 'बाहुबली' चित्रपटाचे दिग्दर्शिक. हा सिनेमा भारतात आणि भारताबाहेर ब्लॉकबस्टर ठरला.  या चित्रपटात प्रभास, राणा डग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्नाः भाटिया, रम्या कृष्णन, सत्यराज, नासर आणि सुब्बाराजू यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bahubali director SS Rajamouli and his family infected with covid19