
Pathaanनं रेकॉर्ड मोडल्यावर बाहुबलीच्या निर्मात्याची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला, 'शाहरुखने हे..'
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमची मुख्य भुमिका असलेला सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' चित्रपट 25 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून हा चित्रपट एकापाठोपाठ एक नवीन रेकॉर्ड बनवत आहे. दररोज बॉक्स ऑफिसवर पठाणच्या कमाईनं नवीन विक्रम केले.
यासोबतच 'पठाण' हा पहिला सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. या शर्यतीत शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने प्रभासच्या 'बाहुबली 2' चित्रपटालाही मागे टाकले आहे.
आता पठाण चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर 'बाहुबली 2' दुसऱ्या क्रमांकावर तर केजीएफ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. पठाणच्या कामगिरीनंतर सर्वच कलाकारांनी शाहरुखसह सर्व टिमचं कौतुक केलं आहे. आता त्यातच बाहुबलीचे निर्माते शोबू यारलागड्डा यांनी 'पठाण च्या या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे.
त्याने ट्विट केले की, "बाहुबली 2' चित्रपटाला मागे टाकल्याबद्दल शाहरुख खान सर, सिद्धार्थ आनंद, YRF आणि 'पठाण'च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. हिंदी NBOC. रेकॉर्ड तोडण्यासाठीच बनवले जातात आणि आनंद आहे की दुसर कुणी नाही तर शाहरुख खानने ते केलं आहे!”
त्याचवेळी निर्मात्याच्या ट्विटला उत्तर देताना, Yrf ने लिहिले, "भारतीय सिनेमा कसा भरभराटीला येत आहे हे पाहण्यापेक्षा दुसर काहीच रोमांचकारी नाही!!... दूरदर्शी एसएस राजामौली दिग्दर्शित बाहुबली चित्रपटासारखा ऐतिहासिक चित्रपट दिल्याबद्दल शोबू यारलागड्डा यांना सलाम. धन्यवाद आणि ते आम्हाला अधिक परिश्रम करण्यास प्रवृत्त करतो."
पठाण चित्रपटाने हिंदी भाषेत सहाव्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 511.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर 'बाहुबली 2' च्या हिंदी आवृत्तीने बॉक्स ऑफिसवर 510.99 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.