Sara Ali Khan: 'माझ्याकडून चुका झाल्या', ब्रेकअप आणि फ्लॉप चित्रपटांवर सारानं व्यक्त केलं दु:ख... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 sara ali khan

Sara Ali Khan: 'माझ्याकडून चुका झाल्या', ब्रेकअप आणि फ्लॉप चित्रपटांवर सारानं व्यक्त केलं दु:ख...

अभिनेत्री सारा अली खान ही बॉलिवुडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. ती सोशल मिडयावरही खुप सक्रिय असते. ती नेहमी तिचे फनी व्हिडिओ पोस्ट करत असते, जे तिच्या चाहत्यांच भरभरुन मनोरंजन करतात. त्याचबरोबर तिचा अभिनयही प्रेक्षकांना आवडतो. मात्र आज सारा वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे.

सारानं 'केदारनाथ' आणि 'सिंबा' अशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण केले. सुरवातीला तिचे चित्रपट यशस्वी झाले मात्र त्यानंतर तिचे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप झाले.

जेव्हा तिने 'लव्ह आज कल' आणि 'कुली नंबर 1' या फ्लॉप चित्रपटावर आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यावर तिनं भाष्य केले आहे. 2020 हे वर्ष त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता, ज्यामध्ये त्याचे ब्रेकअप देखील झाले होतं.

साराने अलीकडेच तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन 'लव्ह आज कल'च्या शूटिंगदरम्यान डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनतर तिनं त्यांच्या रोमँटिक नातेसंबंधाची आणि ब्रेकअपची पुष्टी करण जोहरने त्याच्या 'कॉफी विथ करण' चॅट शोमध्ये केली होती.

2020 मध्ये चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांशी बोलणे बंद केलं.

साराने एका पॉडकास्टमध्ये सांगतिलं की, '2020 अजुनच वाईट झालं. त्याची सुरुवात ब्रेकअपने झाली आणि अजून होत राहिलं. हे एक अतिशय वाईट वर्ष होतं आणि त्यातील बरेच काही भाग इंटरनेटवर आहे. लव आज कल फ्लॉप गेला.

तिने सांगितले की ट्रोलिंगचा तितकासा परिणाम झाला नाही कारण ती आधीच वैयक्तिक रित्याही वाईट अवस्थेत होती. या शोमध्ये तिने तिच्या कडुन काही चुका झाल्याचे मान्य केले.

साराने 'लव्ह आज कल' आणि 'कुली नंबर 1' मध्ये चुका केल्याचंही कबूल केलं आणि सांगितलं की तिचे चुकाकरण्याचे वय आहे. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती विक्रांत मॅसीसोबत 'गॅसलाइट'मध्ये दिसणार आहे.

'अतरंगी रे' चित्रपटानंतर साराची ही दुसरी ओटीटी रिलीज असेल. त्याचबरोबर ती ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात झळकणार आहे.

टॅग्स :viralactressSara Ali Khan