'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम स्नेहलताने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक

स्नेहलताने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
snehlata vasaikar
snehlata vasaikar Instagram/snehlata vasaikar
Updated on

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेत अहिल्याबाई होळकर यांच्या सासू म्हणजे गौतमाबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहलता वसईकर Snehlata Vasaikar हिने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली. 'अध्यात्मिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी काही काळ ऑफलाइन जात आहे', अशी पोस्ट तिने लिहिली आहे. स्नेहलताच्या या निर्णयाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

स्नेहलताने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात भानूची भूमिका साकारली होती. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत 'सोयरा बाईसाहेब' ही भूमिका साकारत ती घराघरात पोहोचली. करिअरच्या सुरुवातीलाच नकारात्मक छटा असलेली भूमिका चोख वठवत स्नेहलताने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयासोबतच स्नेहलता तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते.

snehlata vasaikar
Bigg Boss Marathi 3: सुरेखा कुडची घराबाहेर; स्नेहा वाघ-जय दुधाणेला अश्रू अनावर

याआधीही अनेक सेलिब्रिटींनी विविध कारणांसाठी सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेतला आहे. काहींनी ट्रोलिंगला वैतागून तर काहींनी स्वत:ला वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतला. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने काही महिन्यांपूर्वी ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सोशल मीडियावर वाढतं ट्रोलिंगचं प्रमाण आणि नकारात्मक चर्चा यांमुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं नंतर स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर अभिनेता सुबोध भावेनंही ट्विटर अकाऊंट डिलिट केलं आहे. बॉलिवूडमधल्या काही कलाकारांनीसुद्धा सोशल मीडियापासून ब्रेक घेतला आहे तर काहींनी कायमचं अकाऊंट डिलिट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com