बजरंगीच्या ‘मुन्नी’ नं केली कंगनाची नक्कल, व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salman and munni

बजरंगीच्या ‘मुन्नी’ नं केली कंगनाची नक्कल, व्हिडिओ व्हायरल

मुंबई - बजरंगी भाईजानमध्ये (bajrangi bhaijan) आपल्या अभिनयानं (actress) प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्या मुन्नी अर्थात हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. मुन्नीची भूमिका (munni role) साकारल्यानंतर ती स्टार झाली होती. त्यामुळे तिला बॉलीवूडमध्येही (bollywood) ओळखले जाऊ लागले. सलमान आणि हर्षालीच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षक हर्षालीला तिच्या नावापेक्षा मुन्नी म्हणून ओळखतात. (bajrangi bhaijaan munni aka harshaali malhotra imitate kangana ranaut viral video)

आता हर्षालीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तिनं अभिनेत्री कंगणाची मिमिक्री केली आहे. तिनं त्यात कंगणाचा एक संवाद म्हणून दाखवला आहे. त्या व्हिडिओमधील तिचा अभिनय भारी आहे. अर्थात हा संवाद तिनं लिप सिंक करुन म्हटला आहे. कंगनाचा हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यात कंगना म्हणते, मला नेहमी चांगल राहायला आवडतं. हर्षालीच्या या व्हिडिओलाही चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.

एका युझर्सनं त्यावर तिला प्रतिक्रियाही दिली आहे. त्यानं म्हटलं, हर्षाली तुझी जी सवय आहे, तिच माझी पण आहे. मला तुझा व्हिडिओ आवडला. तिच्या त्या व्हिडिओला आतापर्यत 19 हजारांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत.

हेही वाचा: अभिनेत्री गहनाला पाच महिन्यानंतर दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजूर

यापूर्वी हर्षालीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तिनं 2021 मधल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्या व्हिडिओमध्ये हर्षाली म्हणाली होती, आपण मस्त मजेत जगायला हवं. प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे असं जर आपण जगलो तर त्याची मजा काही औरच आहे. मात्र आपल्याला त्याचा अनेकदा विसर पडतो. आणि आपण चिंताग्रस्त व्हायला लागतो. त्या व्हिडिओला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

टॅग्स :Bollywood News