esakal | बालिका वधू 2 चा ट्रेलर झाला ट्रोल, कारण माहितीये ?
sakal

बोलून बातमी शोधा

बालिका वधू 2 चा ट्रेलर झाला ट्रोल, कारण माहितीये ?

बालिका वधू 2 चा ट्रेलर झाला ट्रोल, कारण माहितीये ?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - काल्पनिक कथांमधून मालिकेची निर्मिती करणे हे काही नवे नाही. यापूर्वी देखील वेगवेगळ्या काल्पनिक कथांना वास्तव घटनेची जोड देऊन त्या मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सध्या बालिका वधूच्या (balika vadhu season 2) दुसऱ्या सीझनची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरुय. त्याचा वाद आता सोशल मीडियावर (social media troll) जोरदार रंगलाय. ट्रोलर्सनं या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कलर्स चॅनेलवर या मालिकेचा दुसरा सीझन प्रदर्शित होणार आहे. (balika vadhu 2 trailer new anandi revealed show to begin from august 9-demand for strict action yst88)

मनोरंजन क्षेत्रात बालिका वधूचे (balika vadhu) नाव अग्रक्रमानं घेतले जाते. बालविवाह प्रथा आणि त्याचे परिणाम हा सामाजिक विषय घेऊन त्याची मनोरंजनच्या दृष्टीनं मांडणी करण्य़ात आली आहे. त्याच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावर या मालिकेला ट्रोलर्सनं नाव ठेवली आहेत. त्याचे कारण म्हणजे ही मालिका त्यांना अतिशय परंपरावादी वाटत आहे. सध्याच्या युगात पुन्हा अठराव्या - एकोणिसाव्या शतकातील विचार मांडण्यात काय उद्देश असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय.

बालिका वधू ही मालिका टीआरपीच्या बाबत वरच्या स्थानावर आहे. मात्र सध्या चॅनेल इतर वाहिन्यांच्या तुलनेत कमी रॅकिंगवर असल्यानं त्यांनी मागील सीझनमधील कथेचा आधार घेतला असल्याची चर्चा आहे. टीव्ही वाहिन्यांवर भुतांच्या सिरिअल, जादू टोण्याच्या कथा यांना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. आता प्रेक्षकांनी अशी मागणी केली आहे की, बालिका वधू सारख्या मालिकांचे प्रसारण थांबवा. त्यासाठी केंद्र सरकारनं काही नियम बनविण्याची गरज आहे. असे मत दर्शक व्यक्त करताना दिसत आहेत.

हेही वाचा: फक्त इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम देणार का? तापसी म्हणते..

बालिका वधूनं सीझन दोनचा ट्रेलर प्रदर्शित केला. त्यात पुन्हा एकदा बालिका वधू दाखविण्यात आली आहे. बालकलाकाराला पुन्हा आनंदी बनविण्यात आले आहे. ट्रेलरमधून असे दिसून येते की, गेल्या आणि सध्याच्या मालिकांमधील अनेक प्रसंग सारखे असल्याचा दावा प्रेक्षकांनी केला आहे. त्यात काही साम्य स्थळे असून प्रेक्षकांनी त्यावर बोट ठेवले आहे.

loading image