esakal | फक्त इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम देणार का? तापसी म्हणते..
sakal

बोलून बातमी शोधा

taapsee pannu

फक्त इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम देणार का? तापसी म्हणते..

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयानं विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तापसी पन्नू Taapsee Pannu तिची मतं नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच तिने स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली. 'आऊटसाइडर्स फिल्म्स' (Outsiders Films) असं या प्रॉडक्शन हाऊसचे नाव आहे. एका मुलाखतीमध्ये तापसीने या प्रॉडक्शन हाऊसबद्दल माहिती दिली आहे. (taapsee pannu say about her production house Outsiders Films)

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तापसीने सांगितले, "मी असा कधीच दावा केला नाही की नेपोटिझम बंद करण्यासाठी मी या प्रॉडक्शनची स्थापना केली. मी फक्त इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम देणार असंही कधी म्हणाले नाही. मी फक्त मला सपोर्ट करणाऱ्या या बॉलिवूड इंडस्ट्रीची आणि प्रेक्षकांची परतफेड करण्यासाठी या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात केली. मला इंडस्ट्रीने दिलेला 'आऊटसाइडर' हा टॅग अभिमानाने स्विकारते. मला या इंडस्ट्रीबाहेरील लोकांच्या म्हणजेच 'आऊटसाइडर्स'च्या भावना माहित आहेत. आतापर्यंत लोक मला 'आऊटसाइडर' म्हणूनच ओळखत होते. पण मी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहात होते."

हेही वाचा: 'जुने चेहरे, नवी सुरुवात'; 'द कपिल शर्मा शो' पुन्हा येतोय

पुढे तापसी म्हणाली, "जर मी फक्त 'आऊटसाइडर्स'ना काम दिले तर माझ्यात आणि स्टार किड्सला काम देण्याऱ्यांमध्ये काहीच फरक राहणार नाही. मी अशा लोकांना काम देईल ज्यांना खरंच कामाची गरज आहे. त्यांच्या पार्श्वभूमीची पर्वा न करता मी त्यांना काम देण्याचा प्रयत्न करेन. नेपोटिझमला बंद करण्यासाठी किंवा त्याला विरोध करण्यासाठी मी या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात केलेली नाही.'

प्रांजल खांडदियासोबत तापसीने आऊटसाइडर्स फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसची सुरूवात केली आहे. प्रांजलने सुपर 30, 83, सूरमा, पीकू आणि मुबारकां या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

हेही वाचा: व्हॅनिटी व्हॅनमध्ये विकी कौशलचा जबरदस्त रॅप; दीपिका, हृतिकही प्रभावित

loading image