विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बाळूमामांच्या चरित्राचा नवा अध्याय!

बाळूमामांच्या चरित्रातील उत्तरार्ध तेवढाच व्यापक आणि सुंदर आहे.
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बाळूमामांच्या चरित्राचा नवा अध्याय!
Summary

बाळूमामांच्या चरित्रातील उत्तरार्ध तेवढाच व्यापक आणि सुंदर आहे.

'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती परउपकारें' अशी संताची खरी ओळख. महाराष्ट्र ही संताची भूमी. महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक थोर संत होऊन गेले, त्यातलेच एक म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामांनी भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याणाचं खूप मोठं कार्य केलं. कलर्स मराठी वाहिनीवर दोन वर्षांआधी सुरू झालेल्या 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' Balumamachya Navan Changbhal ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रभर तुफान गाजत आहे. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातली. शिवायमोठ्या रूपातील बाळूमामांनी ज्यांनी आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवले त्या रूपालादेखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले. आता विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बाळूमामांच्या चरित्राचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

बाळूमामांचं तरुणपण जसं मेंढ्यांसोबत रानोमाळ फिरण्यात गेलं, तसंच त्यांचा उत्तरार्धदेखील वेगवेगळ्या ठिकाणी रानोमाळ फिरण्यातच गेलं. या उत्तरार्धामध्ये एक महत्वाचा बदल झाला होता. तो म्हणजे बाळूमामा लोकांना ठाऊक झाले होते. असंख्य माणसं त्यांच्याशी प्रेमाच्या नात्यानं जोडलेली होती. अनेक कुटुंबांचा मामा आधार झाले होते. कधी योग्य सल्ला देऊन, कधी चुकीच्या वाटेवर जाणार्‍याला योग्य वाटेवर आणून, कधी सहाय्य करून, कधी चमत्कार करून लोकांच्या कल्याणाची कार्ये ते करत राहिले.

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बाळूमामांच्या चरित्राचा नवा अध्याय!
BBM 3: सूत्रसंचालनासाठी महेश मांजरेकरांना मिळतं इतकं मानधन

बाळूमामा हे सर्वदूर परिचित जरी झाले असले तरी त्यांच्यासाठी संघर्ष काही कमी झाला नव्हता. समाजात जात–पात, अंधश्रद्धा, भेदाभेद या गोष्टी संपलेल्या नव्हत्या. हा काळ स्वातंत्र्यानंतरचा आहे. त्यामुळे एक मोठ्या बदलाचा काळ त्यांनी पाहिला. लोकांना तेव्हा एका मोठ्या आधाराची गरज होती, त्यावेळी मामा एखाद्या मोठ्या वटवृक्षासारखे सावली देणारे ठरले. त्यांच्या कार्यावरून लक्षात येते की, त्यांनी उपाशी पोटी अध्यात्म कोणालाच करायला सांगितले नाही. अन्न,वस्त्र, निवारा नसेल तर आधी तो प्रश्न मार्गी लावण्याकडे त्यांचा भर होता. मनुष्याला काही व्याधी असतील तर त्या आधी बर्‍या करण्यावर त्यांनी प्राथमिकता दिली आणि नंतर लोकांना भजन, कीर्तन, पंढरीच्या वारीची सोपी साधना दिली.

यानिमित्ताने बोलताना मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक संतोष अयाचित म्हणाले, “भक्तांच्या मनात वृद्ध बाळूमामांची प्रतिमा कोरलेली आहे. बाल, तरुण बाळूमामा प्रेक्षकांनी पाहिले आहेत आणि त्याला उदंड प्रतिसाद दिला आहे. आता विजयादशमीच्या मुहूर्तावर वृद्ध बाळू मामांचं दर्शन प्रेक्षकांना होणार आहे. बाळूमामांच्या चरित्रात उत्तरार्ध तेवढाच व्यापक आणि सुंदर आहे.”

बाळूमामांचे निसर्गाशी जवळचं नातं होतं. भक्तांसाठी कार्य करत असताना निसर्गात असलेले सगळे जीव किती महत्वाचे आहेत हे त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगातून पटवून दिले. मुक्या जीवांचे प्रेमाने संगोपन ते स्वतः करत होते आणि त्याचबरोबर सर्व जीवांच्या ठाई एकच आत्मा आहे हे आचरणातून सिद्ध करत होते. मामांनी पाच राज्यांमध्ये भ्रमण करत असंख्य कुटुंबांना भक्तीच्या एका सूत्रात बांधलं आणि अनेक पिढ्यांचा उद्धार केला. ही मालिका दररोज संध्याकाळी ७.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com