BBM 3: सूत्रसंचालनासाठी महेश मांजरेकरांना मिळतं इतकं मानधन

आठवड्यातील दोन भागांसाठी ते सूत्रसंचालन करतात.
Mahesh Manjrekar
Mahesh Manjrekar
Summary

आठवड्यातील दोन भागांसाठी ते सूत्रसंचालन करतात.

Bigg Boss Marathi 3: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'ची लोकप्रियता प्रचंड आहे. या शोमधील स्पर्धक रोजच्या निरनिराळ्या टास्कने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. या शोच्या गेल्या दोन्ही सिझनचे सूत्रसंचालन मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर Mahesh Manjrekar यांनी केले. महेश त्यांच्या सूत्रसंचालनाच्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या या शोचा तिसरा सिझन चांगलाच गाजतोय. पहिल्या दोन सिझननंतर सूत्रसंचालक म्हणून महेश मांजरेकर यांनी कमबॅक केलं. मांजरेकरांवर काही दिवसांपूर्वी कर्करोगाची शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे ते बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करतील की नाही, अशी शंका प्रेक्षकांना होती. मात्र नव्या लूकमध्ये पुन्हा जोमाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.

यंदाच्या सिझनमध्ये वीकेंडचा वारऐवजी शनिवारची चावडी हा बदल करण्यात आला. या चावडीमध्ये मांजरेकर काही स्पर्धकांची शाळा घेतात तर काहींची स्तुती करतात. चावडीवरील मांजरेकरांचा लूकसुद्धा चर्चेत राहिला. आठवड्यातील दोन भागांसाठी ते सूत्रसंचालन करतात. या दोन भागांसाठी त्यांना जवळपास २५ लाख रुपये इतकं मानधन मिळतं.

Mahesh Manjrekar
Samantha |"ते म्हणतात माझं अफेअर होतं, मी गर्भपात केला"

महेश मांजरेकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी मूत्राशयाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. बिग बॉस मराठीची ऑफर स्वीकारण्यापूर्वी महेश मांजरेकर हे 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर काम करत होते. 'अंतिम : द फायनल ट्रुथ' असं या चित्रपटाचं नाव आहे.

हिंदी बिग बॉसच्या संपूर्ण सिझनसाठी सलमान खानला तब्बल ३५० कोटी रुपये मानधन मिळतं. विशेष म्हणजे यंदाच्या सिझनसाठी त्याने त्याचं मानधन दुप्पट केल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com