Banaras: 'तू तर मुस्लिम तरीपण...' अभिनेत्यानं पत्रकाराची केली बोलती बंद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Banaras Movie

Banaras: 'तू तर मुस्लिम तरीपण...' अभिनेत्यानं पत्रकाराची केली बोलती बंद!

Banaras Movie Pramotion: देशात मनोरंजन क्षेत्रातील वातावरण सध्या वेगळ्या प्रकारे समोर येत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड बॉयकॉट असा ट्रेंड सुरु आहे. त्याचा फटका मोठमोठ्या अभिनेत्यांना बसला आहे. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढाला मोठा मानसिक त्रास यानिमित्तानं सहन करावा लागला होता. आता एक असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये त्या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेमध्ये अभिनेत्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले आहे.

बनारस हा चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये जैद खान हा प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्या प्रमोशनसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेनं सोशल मीडियावरुन लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये जैदला एका पत्रकारानं इस्लामवरुन प्रश्न विचारला. त्यावर जैदनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. त्याला ज्यावेळी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं एका क्षणात पत्रकाराला गप्पं केल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Nikki Tamboli: निक्कीला पाहावं, शांत व्हावं!

इस्लाममध्ये चित्रपट पाहणे आणि चित्रपटात काम करणे हे दोन्ही हराम आहे. असे सांगण्यात आले आहे. आता तू तर मुस्लिम असून चित्रपटामध्ये हिरोची भूमिका करतो आहेस, याविषयी तुला काय वाटते, असा प्रश्न त्या पत्रकारानं झैदला विचारला होता. यावरुन झैद काय उत्तर देणार, तो चिडून तर बोलणार नाही ना, अशी भीती निर्मात्यांना होती. मात्र परिस्थितीचा अंदाज घेऊन झैदनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

हेही वाचा: Raveena Tondon: रविनानं पुन्हा धरलं बाळसं! कसली दिसतीये...

झैद म्हणाला, दरवेळी आपण त्याच त्याच त्या गोष्टींवरुन का बोलत असतो...मला एक गोष्ट कळते ती म्हणजे कलाकाराला कोणताही धर्म नसतो, प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हेच त्याचे काम असते. अशावेळी अमुक कलाकार एखाद्या धर्माचा, पंथाचा असे म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता त्यात मला कोणतेही तथ्य वाटत नाही. असे उत्तर झैदनं दिले.

हेही वाचा: Nikki Tamboli: 'ही' निक्की तांबोळी आहे तरी कोण?