Bappi Lahiri Birth Anniversary: 'या' कारणामुळे बप्पी लहरी यांचे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होते नाव

Bappi Lahiri Birth Anniversary: संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या बप्पी लहरी यांनी बॉलिवूडला रॉक आणि डिस्को संगीताची ओळख करुन दिली.
Bappi Lahiri Birth Anniversary
Bappi Lahiri Birth AnniversarySakal

Bappi Lahiri Birth Anniversary: गायक बप्पी लहरी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. बप्पी लहरी यांचे खरे नाव फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांचे खरे नाव आलोकेश लहरी होते. त्यांचे वडील एक प्रसिद्ध गायक होते तर त्यांची आई संगीतकार आणि गायिका होती. त्यामुळे त्यांना संगीताचा वारसा मिळाला.

40 वर्षांहून अधिक काळ 'डिस्को डान्सर'पासून 'ऊ ला ला' पर्यंत एकापेक्षा एक गाण्यांवर संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या बप्पी लहरी यांनी सर्वांना आपला चाहता बनवलं होतं. लोकांना त्यांची गाणी खूप आवडली. गाण्यांव्यतिरिक्त, त्यांनी अनेक कर्तृत्व देखील केले होते, ज्याबद्दल कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका यशाबद्दल सांगणार आहोत.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

खरं तर, युनायटेड किंग्डम-आधारित वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने बप्पी दा यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सन्मानित केले. आपल्याला कदाचित हे माहित नसेल की, बप्पी दा डिस्को संगीताला भारतीय रूप देण्यासाठी ओळखले जातात. एकाच वर्षात 33 चित्रपटांत काम केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीतही त्यांनी हा खुलासा केला. त्यांनी सांगितले होते की, एकावेळी त्यांच्या नावावर 5 स्टुडिओ बुक झाले होते. 'चायना अॅवॉर्ड' देण्यात येणारे बप्पी लहरी हे पहिले भारतीय संगीतकार होते. खरं तर हा मान त्यांना त्यांच्या 'जिमी जिमी' या सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी देण्यात आला होता.

बप्पी दा यांनी केवळ हिंदी चित्रपटांसाठीच काम केले नाही तर त्यांनी बंगाली, मल्याळम, कन्नड, तेलुगू, पंजाबी आणि ओरिया गाण्यांमध्येही संगीत दिले आहे. बप्पी लहरी यांनी वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि जानेवारी 2018 मध्ये त्यांना 63 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कारही देण्यात आला.

Bappi Lahiri Birth Anniversary
Budget Meeting : 'या' कारणामुळे कामगार संघटनांचा अर्थसंकल्पपूर्व बैठकीवर बहिष्कार

बप्पी दा यांनी केवळ चित्रपटांसाठीच गाणी गायली नाहीत तर त्यांनी अनेक भाषांतील चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. याशिवाय त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्यांना अनेक चित्रपटांमध्ये पाहुण्यांची भूमिका देण्यात आली होती. 1974 मध्ये त्यांनी किशोर कुमार यांच्या '‘बढ़ती का नाम दाढ़ी’ या चित्रपटात बापू जिप्सीची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी 1983 मध्ये आलेल्या 'कलाकार' आणि 1990 मध्ये आलेल्या 'नयन मोनी' या सिनेमातही काम केले होते. आज बप्पी दा आपल्यात नाहीत पण त्यांच्या कामामुळे ते कायम लोकांच्या स्मरणात राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com