

Bastar: The Naxal Story Trailer Out: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) फेम अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ही आता 'बस्तर द नक्सल स्टोरी' (Bastar The Naxal Story ) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'बस्तर द नक्सल स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ट्रेलरमध्ये अदा शर्मा ही नक्षलवादाविरुद्ध लढताना दिसत आहे.
अदा शर्मा ही 'बस्तर द नक्सल स्टोरी' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आयपीएस नीरजा माधवन या भूमिकेत दिसत आहे.बस्तर या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही सीन्स पाहून अंगावर शहारे येतात. ट्रेलरमध्ये नक्षलवाद्यांची क्रूरता तुम्ही पाहू शकता. बस्तरमधील एक महिला अदाला सांगते की, तिने तिचा नवरा आणि मूल गमावले आहे.
ट्रेलरमध्ये गावातील नक्षलवाद्यांची दहशतही दाखवण्यात आली. ट्रेलरमध्ये ही नीरजा नक्षलवाद्यांच्या विरोधात उभी राहिलेली दिसत आहे. आता अदा नक्षलवाद्यांच्या विरोधातील ही लढाई कशी लढते? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 'बस्तर द नक्सल स्टोरी' हा चित्रपट बघावा लागेल.
'बस्तर द नक्सल स्टोरी' या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन केलं आहे. या चित्रपटात इंदिरा तिवारीनं देखील काम केलं आहे.सनशाईन पिक्चर्सच्या बॅनरखाली अशिन ए. शाह यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट 15 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
अदा शर्माचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटात अदासोबत योगिता बिहाणी, सोनिया बालानी, सिद्धी इदनानी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. आता अदाच्या 'बस्तर द नक्सल स्टोरी' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.