esakal | 'बिग बॉस मराठी' फेम हिना पांचाळचं सडेतोड प्रत्युत्तर; 'ज्यांनी माझी खिल्ली उडवली..'
sakal

बोलून बातमी शोधा

hina panchal

दिसण्यावरून ज्यांनी हिनाची खिल्ली उडवली होती, त्या सर्वांना हिनाने या पोस्टद्वारे उत्तर दिलं आहे. 

'बिग बॉस मराठी' फेम हिना पांचाळचं सडेतोड प्रत्युत्तर; 'ज्यांनी माझी खिल्ली उडवली..'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेऊन चर्चेत आलेली अभिनेत्री हिना पांचाळ सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. हिनाने नुकत्याच तिच्या एका पोस्टमधून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. दिसण्यावरून ज्यांनी हिनाची खिल्ली उडवली होती, त्या सर्वांना हिनाने या पोस्टद्वारे उत्तर दिलं आहे. 

स्वत:चा फोटो पोस्ट करत हिनाने या पोस्टमध्ये लिहिलं, 'मी लहानाची मोठी होत असताना ज्यांनी माझ्या त्वचेची, हास्याची खिल्ली उडवली आणि ज्यांच्यामुळे मी माझा आत्मविश्वास गमावला होता, त्यांना मी सांगू इच्छिते की आता मी जशी आहे तशी स्वत:वर प्रेम करायला शिकले आहे. माझ्या अवतीभवती असणाऱ्या प्रिय व्यक्तींसोबत मी खूश आणि समाधानी आहे.'

हेही वाचा : 'या' कारणामुळे अभिषेक-करिश्माचं होऊ शकलं नाही लग्न

हिनाने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये भाग घेतला होता. वाईल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे हिना या शोमध्ये सहभागी झाली होती. हिनाच्या बोल्ड अंदाजाची सोशल मीडियावर फार चर्चा झाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही हिना सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात आहे. हिना बऱ्याच मराठी आणि भोजपुरी चित्रपटांमधील गाण्यांमध्ये झळकली आहे. 
 

loading image