सोशल मीडियावर दाढी बहाद्दर सिनेअभिनेत्यांचा ट्रेंड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

आपल्या दमदार अभिनयाने कमी कालावधीत आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवणारा, विकी कौशलचा लूक देखील या टाळेबंदीमुळे बदलला आहे. मात्र, तरीही त्याचा असा फोटो चाहत्यांनी पसंत केलेला दिसून येत आहे.

मुंबई : आज-काल कोणत्या फॅशनचा ट्रेंड कधी येईल याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. लॉकडाउनमुळे काहींना घरा बाहेर जाता येत नाही. जसजशी टाळेबंदी वाढते आहे. तसतशी पुरुषांची केस-दाढीदेखील वाढतेच आहे. मोठमोठ्या सिनेअभिनेत्यांपासून अगदी सामान्य माणसांपर्यत अनेकांना केस-दाढी वाढविण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही.दाढी बहाद्दर सिनेअभिनेत्यांचा फोटो काढून शेअर करण्याचा ट्रेंड सुरू आहे.

अशा परिस्थितीत सिनेअभिनेत्यांची वाढलेली दाढी हा समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, कार्तिक आर्यन, विकी कौशल, रणवीर सिंह, हृतिक रोशन, अजय देवगण, टायगर श्राॅफ अशा अनेक अभिनेत्यांनी आपली दाढी वाढवलेली आहे. त्यांनी ट्विटरवरआणि इन्स्टाग्रामवरुन आपला सध्याचा लूक शेअर केलेला आहे,त्यामुळे त्यांचे चाहतेदेखील त्यांच्या या लूकवर प्रचंड खूश असल्याचे दिसत आहे.

सलमान खानने नुकताच जीममध्ये व्यायाम करतानाच व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. त्याचा असा लूक पाहून सलमान खानचे चाहते त्याच्या फोटोवर प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. मध्यंतरी करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस करत असलेल्या कार्याचे कौतुक करण्याकरीता, अक्षय कुमारने ट्विटरवर येत एक व्हिडीओ अपलोड केला. त्यामध्ये त्याची वाढलेली पांढरी दाढी पाहून चाहते खूश झालेले दिसून आले आणि त्याने केलेल्या कौतुकाचे समर्थनदेखील केले.

खरे तर कार्तिक आर्यनच्या क्लीन शेवच्या चेहऱ्यावर हजारो तरुणी मरतात.मात्र, त्याने टाळेबंदीमध्ये दाढी वाढवलेली आहे. त्यामुळे चाहते त्याच्यावर रुसुन बसलेले दिसत आहेत. त्याने शेव करावी, अशी इच्छा त्याच्या आईपासून चाहत्यापर्यंत सर्वांची आहे. असाच आणखी एक हिरो आहे तो म्हणजे रणवीर सिंह, त्याची दाढी सर्व चाहत्यांना त्याच्या प्रेमात पाडणारी आहे. मध्यंतरी टिकटाॅकवर त्याची पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण ही स्वतःच्या हातात कात्री घेऊन रणवीरची मिशी व दाढी कापताना दिसली. मात्र, टाळेबंदीमुळे पुन्हा एकदा रणवीर चाहत्यांना हवा तसा दिसू लागला. त्यामुळे त्याच्याही फोटोवर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा : कियारा अडवाणीचा इंदू की जवानी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

आपल्या दमदार अभिनयाने कमी कालावधीत आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवणारा, विकी कौशलचा लूक देखील या टाळेबंदीमुळे बदलला आहे. मात्र, तरीही त्याचा असा फोटो चाहत्यांनी पसंत केलेला दिसून येत आहे. तसेच, हिंदी सिनेमासृष्टीतील ग्रीक मॅन अशी ओळख असणाऱ्या हृतिक रोशनचा सध्याचा लूक देखील एखाद्या परदेशी अभिनेत्यासारखा दिसत आहे. या दाढी वाढवण्यामध्ये शाहरुख आणि अजय देवगणही मागे नाहीत. त्यांनी आपला आत्ताचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे. त्यावरदेखील चाहते चांगलेच खूश दिसत आहेत. तर, टायगर श्राॅफ देखील आपल्या वाढलेल्या दाढीचा फोटो घेऊन चाहत्यांमध्ये चर्चेत  आहे. अशाप्रकारे दाढी बहाद्दर सोशल मीडियावर आपले दाढीचे फोटो अपलोड करत चाहत्यांची मने जिंकत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beard Won The Hearts Of The Fans