
Beast: 'असं कसं विमान उडवलं, लॉजिक कुठंय? एअरफोर्स पायलटचा आक्षेप
Tollywood News: विजय थलापती हा साऊथचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा (Vijay Thalapathy) चाहतावर्गही मोठा आहे. त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्गही प्रचंड आहे. गेल्या महिन्यात त्याचा बिस्ट नावाचा चित्रपट प्रदर्शित (Beast Movie) झाला होता. त्याला बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला होता. थलापती विजय हा देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्याच्या चित्रपटांना नेहमीच तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. विजय आणि (Social media news) पुजा हेगडेच्या बिस्ट चित्रपटामध्ये काही सीनमध्ये लॉजिक नसल्याचे एका एअरफोर्सच्या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. विमान उडवताना विजयनं (Pooja Hegde) ज्याप्रकारे भूमिका केली आहे तसे कधी होत नाही. काहीच लॉजिक लावलेलं नाही. असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
केजीएफच्या 2 पार्टला टक्कर देण्यात बिस्ट काही अंशी यशस्वीही झाला होता. मात्र केजीएपुढे सगळ्याच चित्रपटांना धक्का दिला आहे. बॉलीवूड तर सध्या सुप्तावस्थेत आहे. त्याचे कोणतेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले नाहीत. सप्टेंबरमध्ये आमीर खानचा लाल सिंग चढ्ढा नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. याशिवाय इतर बॉलीवूड पटांना मिळणारा प्रतिसाद संथ आहे. गेल्या आठवड्यात रणवीर सिंग जयंतीलाल जोरदार नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र तो फ्लॉप झाल्याचे दिसून आले आहे. साऊथ चित्रपट पाहायचं म्हटल्यावर त्याच्या इतर काही बाबींकडे दुर्लक्ष करावे लागते. असे म्हटले जाते. मारधाडपट तयार करणाऱ्या साऊथच्या चित्रपटांमधील काही प्रसंगामधील अतिरंजितपणा अनेकदा निराशा करणारा असतो. असेही दिसुन आले आहे.
हेही वाचा: Bollywood VS South: कमाईतही टॉलीवूड दिग्दर्शक 'टॉपर', बॉलीवूड 'काठावर'
विजय बिस्टमध्ये एक विमान उडवताना दिसत आहे. तो अतिशय सहजपणे ते विमान उडवतो. मात्र त्यावेळी त्यानं हेल्मेट परिधान केलेलं नाही. त्यानं पायलेटचा ड्रेसही घातलेला नाही. हा सीन जेव्हा एका एअरफोर्स अधिकाऱ्यानं पाहिला तेव्हा त्यांना त्यात काही त्रुटी आढळून आल्या. एवढया वेगानं सुपर फास्ट विमान उडवणाऱ्या विजयला काहीच लॉजिक कसं नाही... त्या अधिकाऱ्यानं तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यासंबंधी काही प्रश्नही उपस्थित केले आहे.
हेही वाचा: Bollywood V/S South : तुला साऊथचे चित्रपट आवडतात का? रणवीर सिंगचं कडक उत्तर
Web Title: Beast Movie Thalapathy Vijay Pilot Scene Controversy Viral Air Force Officer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..