बेला शेंडे निवडणार बेस्ट स्पर्धक | Bela Shende | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bela Shende
बेला शेंडे निवडणार बेस्ट स्पर्धक

बेला शेंडे निवडणार बेस्ट स्पर्धक

पुणे - सोनी मराठीवर सुरू होणा-या 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रोडक्शन्स प्रा. लि. ही संस्था करते आहे. पहिल्यांदाच मराठी भाषेत इंडियन आयडल सुरू होणार असून देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल आता महाराष्ट्रासाठी आवाज शोधणार, ही उत्सुकतेची बाब आहे.

या सुरांच्या प्रवासाला लिखाणाचीही साथ लाभणारे. लेखक वैभव जोशी या शो चं लिखाण करणार असून एक दमदार कलाकृती रसिकांना बघायला मिळेल. आयडलच्या ऑडिशनला अजय-अतुल यांच्यासोबत लोकप्रिय गायिका बेला शेंडे सुद्धा असणार आहे. इंडियन आयडलसाठी बेस्ट स्पर्धक निवडण्यासाठी ती तिचे मोलाचे सल्ले देणार आहे. बेलाने तिच्या गोड गळ्यामुळे मनोरंजनसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य अशा विविध सृष्टीत आपल्या आवाजाची झलक तिने दाखवली आहे.

स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी अजित परबही ऑडिशनला असणार आहे. गाणे कसे निवडायचे, आणि त्याचा सराव कसा करावा ह्या सगळ्यात म्युझिशियनच्या मदतीने ते स्पर्धकांना मदत करतील.

loading image
go to top