
Shah Rukh Khan Pathaan: पठाणच्या विरोधात उभे राहिले बंगाली, बंगालमध्ये शाहरुखविरोधात पेटला नवा वाद
पठाण सिनेमा उद्या २५ जानेवारीला संपूर्ण भारतभरात रिलीज होतोय. पठाण च्या रिलीजला अवघे काही तास बाकी असताना सिनेमाने नवीन वाद ओढवून घेतलाय. पठाण विरोधात बंगाल मध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पठाण ने बंगाल मधले सगळे थेटर काबीज केले आहेत. त्यामुळे प्रादेशिक सिनेमाच्या फिल्मकेकर्सने पठाण विरोधात नाराजी दर्शवली आहे.
हेही वाचा: Pathaan Movie: पैशाला नाय तोटा 'पठाण'चा आनंद मोठा! अडीच हजारांना एक तिकिट, तरीही...
झालं असं कि.. गेल्या आठवड्यात 'काबेरी अंतरधन', 'दिलखुश' आणि 'डॉक्टर बक्षी' हे तीन बंगाली सिनेमे थिएटरमध्ये रिलीज झाले. या तीनही सिनेमांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. परंतु चांगला प्रतिसाद असूनही ‘पठाण’ला जास्तीत जास्त शो देण्यासाठी या तीनही सिनेमांचे शो झटकन कमी करण्यात आले. याशिवाय अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेता देव यांचा ‘प्रोजापोटी’ रिलीज होऊन ५० यशस्वी दिवस झाले आहेत. परंतु याही सिनेमाचे शो कमी करण्यात आले.
टॉलीवूडच्या डिस्ट्रिब्युटर्सनी याविषयी बंगाली सिनेमांसाठी आवाज उठवला आहे. ‘पठाण’ च्या डिस्ट्रिब्युटर्सनी पठाण साठी सर्व सिंगल स्क्रीनवर ताबा मिळवला आहे. सिंगल स्क्रीन वाल्यांनी पठाण चे सर्व शो बुक केले आहेत. सर्व सिंगल स्क्रीन थेटर शाहरुखच्या शाहरुखच्या सिनेमाला मिळाल्याने बंगाली चित्रपट निर्माते संतापले. त्यामुळे बंगालमध्ये पठाण विरोधात तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे. एकूणच पठाण मुळे प्रादेशिक सिनेमांची मुस्कटदाबी झाल्याचं पाहायला मिळतंय.
हेही वाचा: Pathaan Controversy: पुण्यात बजरंग दलाचा राडा! 'पठाण'चं पोस्टर फाडलं...
शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम,डिंपल कपाडिया,आशुतोष राणा सोबत अेनक स्टार्स असणार आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यश राज फिल्म्सच्या प्रॉडक्शन अंतर्गत हा सिनेमा बनवण्यात आला आहे.