
Berojgar : हिराबाग झोपडपट्टीतला संभाजी ससाणे आज वेबसिरीज गाजवतोय..
berojgar web series : संभाजी ससाणे अर्थात भाडिपाच्या बेरोजगार (B.E.ROJGAR) सिरीज मधला पापड्या. सध्याचा चर्चेतला अभिनेता. या सिरिज मधील त्याचे काम त्यांत गाजले. त्याने आजवर काही चित्रपटही केले आहेत. पण त्याला खरी ओळख मिळाली ते 'बेरोजगार' या वेब सिरिजमुळे. आज जरी तो आपल्या अभिनयाने सर्वत्र चमकत असला तरी इथपर्यंत पोहोचणं त्याच्यासाठी सोप्पं नव्हतं. पुण्यात हिराबागेतल्या झोपडपट्टीत गेलेलं बालपण, आर्थिक संकटं, बंडखोर स्वभाव, भांडण - मारामाऱ्या ते गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष असे अनेक कंगोरे संभाजीच्या आयुष्याला जडले आहेत. हाच त्याच्या यशाचा प्रेरणादायी प्रवास त्याने सकाळ unplugged या पॉडकास्ट मध्ये उलगडला आहे.
संभाजी ससाणेचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. पुण्यातल्या हिराबागेतील झोपडपट्टीत संभाजीचं आयुष्य गेलं. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. वडील शिवणकाम करायचे. घरात पाच बहिणी आणि संभाजी. बरं संभाजी आणि शाळा यांचा जेमतेम संबंध होता. पण त्याला नाटकाची आवड होती. संभाजीने आवड म्हणून गणेशोत्सवात (स्ट्रीट प्ले) पथनाट्य करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याला अभिनयाची अधिक गोडी लागली. नंतर त्याने ड्रामा स्कूल मुंबईमधून अभिनयाचे धडे घेतले आणि त्याच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. (berojgaar web series fame papadya aka sambhaji sasane struggle and success story)
केवळ हाच संभाजीचा संघर्ष नाहीय तर या पालिकडेत्याने बरंच काही अनुभवलं आहे. एकेकाळी तो मारामाऱ्या, बंडखोरी अशा मार्गाने निघाला होता. याचं कसं होईल याची चिंता घरच्यांना पण सतावत होती. पण सांभाजीने यातून मार्ग काढत स्वतःचं ध्येय गाठलं. झोपडपट्टीत बालपण,मग गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष आणि आता अभिनेता ही संघर्ष कहाणी शब्दात मांडणे कठीणच. पण हा सर्व प्रवास सांभाजीने आपल्या पॉडकास्ट मध्ये उलगडला आहे. त्यामुळे तुमचा लाडका पापड्या अर्थात संभाजीची इनस्पायरिंग स्टोरी ऐकण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर नक्की क्लिक करा.
Web Title: Berojgaar Web Series Fame Papadya Aka Sambhaji Sasane Struggle And Success Story
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..