Keep Shining! आदित्य ठाकरेंना दिशा पटानीने दिल्या प्रेमळ शुभेच्छा!

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 13 June 2020

दिशा पटानीने आदित्य ठाकरे यांना सोशल मिडीयावरून शुभेच्छा दिल्या आहेत. तिने शुभेच्छा दिल्यामुळे पुन्हा या दोघांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई  ः जाहिरातींबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणारी अभिनेत्री दिशा पटानी आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. दिशा पटानीने आदित्य ठाकरे यांना सोशल मिडीयावरून शुभेच्छा दिल्या आहेत. तिने शुभेच्छा दिल्यामुळे पुन्हा या दोघांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

जन्मतः हृदयात तीन ब्लॉक असलेल्या बाळाच्या उपचारासाठी आदित्य ठाकरेंनी दिला मदतीचा हात

दिशा पटानी आज आपला २८ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. मागील वर्षभर आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यातच आज दिशाने आदित्य ठाकरे यांना ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात तिने म्हटले आहे की वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदित्य ठाकरे. असाच चमकत राहा. या मॅसेज बरोबरच स्माईली हार्टवाला इमोजीसुद्धा दिशाने पोस्ट केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा या दोघांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाद्वारे दिशाने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची चर्चा होते. 

Best wishes from Disha Patani to Aditya Thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best wishes from Disha Patani to Aditya Thackeray