'भाबीजी घर पर है'मध्‍ये विदिशा दिसणार अनिता भाभीच्या भूमिकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाबीजी घर पर है

'भाबीजी घर पर है'मध्‍ये विदिशा दिसणार अनिता भाभीच्या भूमिकेत

नवी मुंबई : टीव्‍हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है' या मालिकेमध्ये विदिशा श्रीवास्‍तव ही आता अनिता भाभी या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. यावेळी सर्व कलाकारांनी तीचे स्वागत केले आणि सेटवर केक कापत आनंद व्यक्त केला आहे.

सेटवर उत्‍साहपूर्ण स्‍वागताबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत विदिशा म्‍हणाली, ''मला इतका उत्‍साह, प्रेम व आपुलकी पाहून खूपच आनंद झाला, जेथे माझे सेटवर स्‍वागत करण्‍यात आले. हा दिवस माझ्यासाठी खूपच खास ठरला. मी अनिता भाभीच्‍या आयकॉनिक भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍याची मोठी जबाबदारी सांभाळण्‍यासाठी माझ्या क्षमतांवर विश्‍वास दाखवण्‍याकरिता संजय व बीनायफर जी यांचे आभार मानते. विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख), मनमोहन तिवारी (रोहिताश्‍व गौड) व अंगूरी भाभी (शुभांगी अत्रे) यांसारख्या दिग्‍गज व अनुभवी कलाकारांसोबत, तसेच इतर प्रतिभावान कलाकार व टीमसोबत काम करण्‍याची ही अद्भुत संधी मिळणे स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखे आहे. सर्वजण खूपच चांगले व सहाय्यक आहेत. हा गेस्‍चर खूपच सुरेख होता. मी शूटिंगला सुरूवात केली आहे आणि २२ मार्च रोजी माझ्या प्रवेशासाठी खूपच उत्‍सुक आहे. मी आशा करते की, प्रेक्षकांना माझा अभिनय आवडेल.''

विदिशाचे स्‍वागत करत एडिट २ प्रॉडक्‍शन्‍समधील निर्माता संजय कोहली म्‍हणाले, ''आम्‍ही आमची नवीन अनिता भाभी म्‍हणून विदिशाचे स्‍वागत करण्‍यास खूपच उत्‍सुक व आनंदित आहोत. तिचा प्रवेश दाखवणारा एपिसोड अत्‍यंत उत्‍साहवर्धक व रहस्‍यमय आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षक ते पाहण्‍याचा आनंद घेतील. आम्‍ही आशा करतो की प्रेक्षक तिच्‍यावर प्रेम व आपुलकीचा वर्षाव करतील, जे त्‍यांनी आमच्‍या मालिकेच्‍या बाबतीत दाखवले आहे आणि खुल्‍या मनाने तिचे स्‍वागत करतील. 'भाबीजी घर पर है' परिवारामध्‍ये विदिशाचे स्‍वागत!''

एडिट २ प्रॉडक्‍शन्‍समधील निर्माता बिनायफर कोहली म्‍हणाल्‍या, ''आम्‍हाला आमची नवीन अनिता भाभी म्‍हणून विदिशाची नियुक्‍ती करण्‍याचा आनंद होत आहे. विदिशाने सुरेखरित्‍या भूमिकेला आत्‍मसात केले आहे, जे मालिकेमध्‍ये पाहणे पूर्णत: आनंददायी असणार आहे. ती उत्तम व्‍यक्‍ती आहे आणि सर्वांमध्‍ये मिसळून गेली आहे. तिचा लुक उत्‍साहवर्धक आहे आणि निश्चितच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल.''

याबाबत विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) म्‍हणाले, ''विदिशाचे स्‍वागत! आम्‍ही एकत्र शूटिंगला सुरूवात केली आहे. ती सहजपणे सर्वांमध्‍ये मिसळून गेली आहे. मला खात्री आहे की, नवीन अनिता भाभी भूमिकेमध्‍ये अधिक फ्लेवरची भर करेल. प्रेक्षकांनी विभुती व अनिताच्‍या जोडीचे कौतुक केले आहे आणि मला खात्री आहे की, आम्‍ही त्‍यांची आवडती जोडी म्‍हणून कायम राहू.'' उत्‍साहत मनमोहन तिवारी (रोहिताश्‍व गौड) म्‍हणाले, ''तिवारीजीच्‍या बाबतीत काय सांगायचे, तो तर आपल्‍या अनिता भाभीला पाहून खूप आनंदित आहे. मी आमच्‍या भाभीजी परिवारामध्‍ये विदिशाचे स्‍वागत करतो आणि आम्‍ही एकत्र काम करत असताना अद्भुत मैत्रीची सुरूवात करण्‍यास उत्‍सुक आहे.'' याबाबत अंगूरी भाभी (शुभांगी अत्रे) म्‍हणाली, ''विदिशा आणि मी नुकतेच गप्‍पागोष्‍टी करण्‍यास सुरूवात केली आहे आणि आम्‍ही दोघी एकमेकींसोबत काम करण्‍यास उत्‍सुक आहोत. आमचे रील कुटुंब पूर्ण झाले असल्‍याने आता खूप धमाल येईल. विदिशा, आमच्‍या परिवारामध्‍ये तुझे स्‍वागत!''

२२ मार्चपासून विदिशा श्रीवास्‍तवला नवीन 'अनिता भाभी'च्‍या भूमिकेत धमाकेदार प्रवेश करताना पाहण्‍यासाठी पाहत राहा 'भाबीजी घर पर है' दर सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर

Web Title: Bhabhi Ji Ghar Par Hai Vidisha Shrivastav Anita Bhabhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment
go to top