
'भाभीजी घर पर है' मध्ये मलखान ही आयकॉनिक व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता दीपेश भान(Deepesh bhan) आता या जगात नाही. त्याच्या कुटुंबासाठी आणि इतर इंडस्ट्रीतल्या सहकलाकारांसाठी हा मोठा धक्का आहे. लोकांना खळखळवून हसवणाऱ्या अभिनेत्याचं असं अचानक निघून जाणं सगळ्यांनाच चटका लावणारं आहे. भाभी जी घर पर है मालिकेत मनमोहन तिवारी ही व्यक्तीरेखा साकारणारे रोहिताश गौड यांनी दिपेशच्या मृत्यूचा आपल्याला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं आहे.(Bhabhiji Ghar Par Hai fame Deepesh Bhan death: Rohitash Gaud reaction)
रोहिताश गौड म्हणाले, ''आदल्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत आम्ही शूट करत होतो. आणि सकाळचा पुन्हा आमचा शूटिंगसाठी कॉलटाईम होता. पण सकाळी सकाळी ही बातमी ऐकली आणि आम्ही सगळेच अक्षरशः तूटलो. आदल्या दिवशी आम्ही सगळे एकत्रच होतो. मस्ती-मस्करी करणं सुरु होतं. सोशल मीडियावर काल एक व्हिडीओ पण शेअर केला होता. एक बनवून ठेवला होता जो आज पोस्ट करणार होतो. आणि ही सगळा दिपेशचीच आयडिया होती. आम्हाला तर वाटलंही नव्हतं की हा माणूस उद्या आमच्यासोबत नसेल. आणि तो देखील इतका सुदृढ माणूस. मला तर कळतंच नाही,आजकाल हे काय चाललंय, माणसं जीममध्ये व्यायाम करताना , सायकल चालवत असताना मृ्त्यूमुखी पडत आहेत, कोणी खेळाच्या मैदानात जातंय''.
बोलता बोलता रोहिताश गौड पुढे म्हणाले की,''मला असं वाटतं की कोव्हिडनंतर खूप लोकांचं स्ट्रेस लेवल वाढलं. पैसे कमी झालेत. दहा ते पंधरा टक्के. त्यात ईएमआय भरायचे. चांगले प्रोजेक्ट्स बंद झालेयत. लोकांना पैसे मिळाले नाहीत. असं होऊ शकतं तो कुठल्यातरी मानसिक विवंचनेत सापडला असेल. पण तो आमच्याशी याविषयी कधीच काही बोलला नाही. पण मला वाटलं मनातलं बोलायला हवं,मोकळं व्हायला हवं''.
तुमच्या माहितीसाठी इथे नमूद करतो की,शनिवारी सकाळी 23 जुलै रोजी दीपेश भान क्रिकेट खेळण्यासाठी गेला तो परत घरी आलाच नाही. खेळता खेळता अभिनेता अचानक मैदानात जमिनीवर कोसळला आणि पुन्हा उठलाच नाही. त्याच्या मृत्यूचं कारण ब्रेन हॅमरेज सांगितलं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.