Deepesh Bhan च्या नावाने होतेय आर्थिक फसवणूक, कलाकारांनी लोकांना केले सावध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Rohitash Gaur And Aasif Sheikh

Deepesh Bhan च्या नावाने होतेय आर्थिक फसवणूक, कलाकारांनी लोकांना केले सावध

Deepesh Bhan News : 'भाभी जी घर पर हैं' मध्ये मलखानची भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या दीपेश भानचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी आणि १८ महिन्यांचा मुल आहे. त्याच्या निधनाच्या दु:खातून मित्र आणि चाहतेही सावरू शकले नसताना. दीपेशच्या नावाने लोक त्याच्या नावाने फसवणूक सुरु झालीय. त्याचा खुलासा त्याचे सहकलाकार त्रिपाठी जी उर्फ ​​रोहितेश गौर आणि विभूती उर्फ ​​आसिफ शेख यांनी केला आहे.

हेही वाचा: Sapna Chaudhary : गायिका सपना चौधरीविरुद्ध अटक वाॅरंट जारी

तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी सौम्या टंडनने चाहत्यांकडे मदत मागितली होती. दीपेश भानने ५० लाखांचे गृहकर्ज घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. लोकांनी ते भरण्यास मदत करावी. त्यांना जमेल तेवढे योगदान द्या. याशिवाय रोहिताश गौर आणि आसिफ शेख यांनीही निधी उभारणीत सामील होऊन लोकांना याबाबत जागरूक केले.

मात्र, या संधीचा काही लोकांनी चुकीचा फायदा घेतला. आणि दीपेश भान (Deepesh Bhan) यांच्या नावाने बनावट आयडी बनवला. अशा परिस्थितीत लोक फसवणुकीला बळी पडत आहेत आणि नकळत त्यास हातभार लावत आहेत.

हेही वाचा: KK Birthday : केकेच्या गाण्याने भन्साळी रडले, 'हे' गीत ठरले टर्निंग पाॅईंट

व्हिडिओ बनवून दिली माहिती

आता आसिफ शेख आणि रोहितश यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांना आणि हितचिंतकांना सावध केले की दीपेशच्या नावावर फसवणूक होत आहे आणि त्यांनी पैसे जमा करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे. दोघांनीही एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे, की दीपेश भान जो मलखानच्या 'भाभी जी घर पर हैं' मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत होता. (Entertainment News)

अचानक त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी आणि १८ महिन्यांचे मूल आहे. त्याच्या कुटुंबीयांना कोणताही आर्थिक पाठबळ नाही. त्याच्यावर सुमारे ५० लाखांचे गृहकर्ज होते. या कुटुंबाला गृहकर्जातून बाहेर काढणे हेच आमचा उद्दशे असल्याचे दोघांनी व्हिडिओत सांगितले आहे.

हेही वाचा: Allu Arjun चा अमेरिकेत डंका, 'इंडिया डे परेड'मध्ये ग्रँड एंट्री

दीपेश भानच्या नावावर होत आहे फसवणूक

दोघेही पुढे म्हणतात, पण खेदाची बाब म्हणजे काही लोकांनी अनेक बनावट आयडी बनवले आहेत. आणि गैरसमजातून लोक त्यात हातभार लावत आहेत. म्हणूनच आम्ही कॅप्शन आणि कथेमध्ये एक लिंक शेअर केली आहे.

म्हणून कृपया फक्त आणि फक्त त्यावरच तुम्ही आर्थिक मदत करु शकता. तसे, 'भाभी जी घर पर है'च्या संपूर्ण टीमच्या वतीने, जे लोक मनापासून देणगी देत ​​आहेत त्यांचे खूप खूप आभारी... धन्यवाद !

Web Title: Bhabi Ji Ghar Par Hai Actors Revealed People Rise Fund In Tha Name Of Deepesh Bhan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..