KK Birthday : केकेच्या गाण्याने भन्साळी रडले, 'हे' गीत ठरले टर्निंग पाॅईंट

आज गायक 'केके'चा वाढदिवस आहे. तेव्हा मी भन्साळींना रडताना पाहिले. ते काही म्हणाले नव्हते. फक्त पाठीवर हात ठेवला आणि निघून गेले.
Singer KK
Singer KK esakal

Singer KK Birthday : बाॅलीवूडच्या सर्वोत्तम गायकांपैकी एक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ केके ( Singer KK) याचा आज वाढदिवस आहे. आज तो हयात असता तर ५४ वर्षांचा झाला असता. पहिल्यांदाच त्याच्याशिवाय चाहते त्याचा वाढदिवस जगभरात साजरा करत आहेत. त्याचे कुटुंबीय आणि चाहत्यांसाठी हा दिवस आठवणी आणि दुःखांनी भरलेला आहे. यानिमित्त आज आम्ही त्याच्या काही आठवणींना उजाळा देत आहोत.

Singer KK
Sapna Chaudhary : गायिका सपना चौधरीविरुद्ध अटक वाॅरंट जारी

'तडप तडप के' गाण्याने मिळाली ओळख

केकेने आपल्या बाॅलीवूड (Bollywood News) करिअरची सुरुवात चित्रपट 'हम दिल दे चुके सनम' मधून केले होते. या चित्रपटातील 'तडप तडप के' गाणे (Tadap Tadap) त्याने गायले होते. जर तुम्हाला आठवत असेल तर गाण्याच्या व्हिडिओत सलमान खान आपले प्रेम गमवल्यानंतर रडतो.

सलमानच्या या अवस्थेतील भावनांना आवाज केकेने दिले होते. त्यानेच हे गाणे सर्वांच्या जगण्यातील हिस्सा बनवले आणि त्याच्याच आवाजामुळे हे गाण लोकप्रिय ब्रेकअप साँग बनले होते.

Singer KK
Allu Arjun चा अमेरिकेत डंका, 'इंडिया डे परेड'मध्ये ग्रँड एंट्री

गाण्याची मिळाली अशी संधी

हे गाण गाण्याची संधी कशी मिळाली याविषयी स्वतः केके यानेच एका मुलाखतीत सांगितले होते. मी १९९६ मध्ये रहमानकडे जात होतो. माझी गीतकार मेहबूब यांच्याशी घट्ट मैत्री होती. ते एक दिवस म्हणाले, की माझा एक दोस्त आहे, ज्याने गीत लिहिले आहे. तू ते ऐक. ते इस्माईल दरबारचे गाणे होते. एक दिवस मला फोन आला की इस्माइल यांना भेटायचे आहे. आम्ही बांदऱ्यात भेटलो.

त्यांनी मला बाहेरच स्कूटरवर गाण्याचा मुखडा ऐकवला. केके पुढे म्हणाला, इस्माइलने मला सांगितले की केके आता गाण फायनल झालेल नाही. मात्र फायलन झाल तर तूच ते गाशील. त्यानंतर मीही विसरुन गेलो. इस्माईल यांनी काही दिवसानंतर सांगितले, की ज्या चित्रपटात हे गाणे गायले जाणार होते, त्यात ते नाही. ते गाणे संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांना आवडले आहे. मग आम्ही लोकांना गाणे रिकाॅर्ड केले. पुन्हा भन्साळींनी ते ऐकले.

Singer KK
TMKOC : तारक मेहताची भूमिका 'हा' अभिनेता करणार? जेठलालला मिळणार नवीन मित्र

केकेच्या आवाजाने भन्साळी रडले

केकेच्या आवाजातील हे गाणे ऐकून भन्साळींना रडू कोसळले होते. त्याविषयी त्याने सांगितले होते, की मी एक दिवस इस्माइल यांच्या रिकाॅर्डिंग स्टुडिओतून बाहेर पडत होतो. तेव्हा मी भन्साळींना रडताना पाहिले.

ते काही म्हणाले नव्हते. फक्त पाठीवर हात ठेवला आणि निघून गेले. आत गेल्यावर इस्माइल यांनी सांगितले, की त्यांना गाण खूपच आवडल आहे. ते अनेकदा त्यांनी ऐकले आहे.

Singer KK
कृपया माझ्या बाबांच्या टीमविरोधात.. गायक 'केके'च्या मुलीने जोडले हात

पल अल्बम आणि विक्रम

आणखी एका मुलाखतीत गायक केके यांनी सांगितले होते, की १९९८ मध्ये त्याने 'तडप तडप के' गाण रिकाॅर्ड केले होते. याच वर्षी त्याने आपला पहिला आणि सर्वात लोकप्रिय अल्बम 'पल'ही रिकाॅर्ड केले होते. संगीतकार लेझली लुईसने त्याला हा अल्बम बनवण्याची संधी दिली होती.

त्याच सोनी म्युझिक इंटरनॅशनलने केकेला १९९८ मध्ये डेब्यू आर्टिस्ट इन इंडियासाठी निवडले होते. गीतकार मेहबूब यांनी या अल्बममधील गाणे लिहिले होते. १९९८ मध्ये पल अल्बम प्रदर्शित झाल्याने केके खूपच खूश होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com